5.5 C
New York

Rakhi Sawant: बेशुद्ध अवस्थेत राखी सावंत रुग्णालयात… नेमकं काय झालं राखीला ?

Published:

अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. कधी वादामुळे तर कधी वेगळ्या कारणामुळे ती चर्चेत आली आहे. राखीचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. अशातच तिचा हॉस्पिटलमध्ये एका बेडवर झोपलेला फोटो व्हायरल झाला आहे.

बॉलीवूडच्या आयटम गर्लला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयाशी संबंधित आजार असल्यामुळे तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये राखी रुग्णालयातील एका खाटेवर बेशुद्ध अवस्थेत दिसत आहे आणि डॉक्टर तिची तपासणी करताना दिसत आहेत. या बातमीमुळे राखीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ती लवकरात लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना चाहत्यांकडून केली जात आहे.

‘Viral bhayani’ या इंस्टाग्राम अकाउंटने राखीचा फोटो पोस्ट केला आहे. राखीला हृदयाशी निगडीत काही समस्येमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. अद्याप तिला नेमकं काय झालंय हे समजू शकलेलं नाही. डॉक्टरांकडून काय माहिती मिळते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तिच्या कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. राखीला सध्या तिच्या समस्येबाबत गोपनीयता राखायची आहे. तिने याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. ती सध्या बोलण्याच्या अवस्थेत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

जॅकी श्रॉफने घेतली दिल्ली हायकोर्टात धाव… नेमकं प्रकरण काय?

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img