23.1 C
New York

Rajasthan: खाणीत लिफ्टची साखळी तुटली, 14 जण रात्रभर..

Published:

राजस्थानमधील (Rajasthan) झुंझुनू येथील हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या कोलिहान खाणीत मंगळवारी रात्री लिफ्टची साखळी तुटल्याने मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 14 जण रात्रभर खाणीत अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. तब्बल 11 तासांच्या बचावकार्यानंतर आज सकाळी 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

1800 फूट खोल खाणीत अडकले होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थान कॉपर लिमिटेडचे दक्षता पथक आणि वरिष्ठ अधिकारी कोलिहान खाणीतून वर येत असताना लिफ्टची साखळी तुटली. खाणीत कोसळलेल्या लिफ्टमध्ये अडकलेल्या 14 जणांची रात्रभर चाललेल्या बचाव मोहिमेनंतर अखेर सुटका करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थान कॉपर लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी आणि एक दक्षता पथक खाणीच्या कामाची पाहणी करण्यासाठी खाणीत गेले होते. यावेळी खाणीत पाहणी करून पुन्हा वर येत असताना अचानक लिफ्टची साखळी तुटली. त्यामुळे ते 1800 फूट खोल खाणीत अडकले होते. मात्र, घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. खाणीत अडकलेल्या लोकांसाठी अन्नाची पाकिटे, पाणी औषधे पाठवण्यात आली होती.

तत्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी डॉक्टरांचे पथक आणि काही रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यानंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बचावकार्य सुरू असताना पेट्रोल पंपाला आग

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img