23.1 C
New York

Ghatkopar Hording: बचावकार्य सुरू असताना पेट्रोल पंपाला आग

Published:

मुंबईतील घाटकोपर येथील छेडा नगर परिसरात सोमवारी जाहिरात फलक (Ghatkopar Hording) कोसळून भीषण अपघात झाला. घटनेनंतर ४० तासांपासून बचावकार्य सुरू आहे. आज सकाळी (बुधवार) या ठिकाणी बचावकार्य सुरू असताना पेट्रोल पंपाला आग लागली. बुधवारी सकाळी लागलेल्या आगीमुळे प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली आहे. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सीएनजी गॅस आणि पेट्रोल पंप आहेत. मात्र दहा मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले. आग लागल्यानंतर मुंबई पोलिसांनी परिसर सील केला आहे.

आणखी चार मृतदेह बाहेर काढण्यात आले

दरम्यान, आज सकाळी घाटकोपरच्या होर्डिंगच्या ढिगाऱ्याखालून आणखी चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत. त्यामुळे मृतांचा आकडा 18 वर जाण्याची शक्यता आहे. घाटकोपरमधील होर्डिंगच्या घटनेला आता ४० तास उलटले आहेत. त्यानंतर बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकले आहेत. त्या ठिकाणी पेट्रोल पंप असल्याने गॅस कटरचा वापर न करता बचावकार्य सुरू आहे. पेट्रोल पंप असल्याने बचाव पथक जपून काम करत आहे. मात्र बुधवारी सकाळी पेट्रोल पंपाला आग लागली. कटरने मोठे लोखंड कापत असताना आग लागली. आगीची घटना होताच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. या ठिकाणी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.

65 जवान, 20 मशिनद्वारे डेब्रिज हटवले
आग लागल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला आहे. परिसरातील लोकांनाही सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पेट्रोल पंपाला लागलेल्या आगीमुळे ही काळजी घेण्यात आली आहे. सुदैवाने आग काही वेळातच आटोक्यात आली. 65 अग्निशमन दलाचे जवान, एनडीआरएफचे जवान, 20 मशिन ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेली वाहने बाहेर काढण्यात आली आहेत. आणखी काही वाहने असण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img