3.6 C
New York

Narendra Modi : नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Published:

मुंबई

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान भाजपा (BJP) आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप चढवून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांना मानणा-या करोडो शिवभक्तांचा अपमान केला आहे. या अपमानाबद्दल प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत पण या दैवताचा सातत्याने अपमान केला जात आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भापजाचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेकांनी महाराजांचा अपमान केला पण भारतीय जनता पक्षाने त्यावर चकार शब्द काढला नाही. अयोध्यातील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यातही श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांनी नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. असे प्रकार शिवाजी महाराजांचा अपमान करणारे आहेत, त्याला आळा घातला पाहिजे पण त्यात भरच पडत आहे.

अंडरवर्ल्ड माफिया दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इकबाल मिर्चीसोबत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जमीन व्यवहार केल्याप्रकरणी ईडीकडून चौकशी झाली होती. देशद्रोह्याची संबंध असलेल्या प्रफुल्ल पटेलचे पापी हात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपला लागले हे लाजिरवाणे आहे. या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करत आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img