21 C
New York

Mr and Mrs Mahi: जान्हवी कपूर आणि राजकुमार राव पुन्हा एकत्र

Published:

जान्हवी कपूर (Janhavi kapoor) आणि राजकुमार राव (Rajkumar Rao) पुन्हा एकदा झळकणार आहेत. ‘मिस्टर अँड मिसेस माही’ (Mr and Mrs Mahi) ह्या चित्रपटाचा ट्रेलर २ दिवसांपूर्वी लाँच झाला असून दोघांची जोडी एकदम झकास दिसत आहे. खास गोष्ट म्हणजे आयपीएल (IPL 2024) सामन्यादरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आलायं. त्यामुळे ट्रेलर एकदम हटके वाट्ल्याचा अंदाज प्रेक्षकांकडून वर्तवला जातोय. राजकुमारचा ‘श्रीकांत’ (Shrikanth) हा सिनेमा अलीकडेच येऊन गेला आणि आता जान्हवी आणि राजकुमारच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना वेड लावलं आहे.

करण जोहर (Karan Johar) आणि राजकुमार राव यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा ट्रेलर लाँच करण्यात आलाय. जान्हवी कपूर आणि राजकुमार रावचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी ‘रुही’ ह्या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक शरण शर्मा (Sharan Sharma) असून मिस्टर अँड मिसेस माही हा चित्रपट ३१ मे रोजी रिलीज होणार आहे. सिनेमाची निर्मिती करण जोहरने केली आहे. सोशल मीडियावर हा ट्रेलर तुफान व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.

 बेशुद्ध अवस्थेत राखी सावंत रुग्णालयात… नेमकं काय झालं राखीला ?

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img