मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पाचवा टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे. या टप्प्यामध्ये 13 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या स्पर्शभूमीवर मुंबईत (Mumbai) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा रोड शो (Road Show) आयोजित करण्यात आला आहे. मोदींच्या रोड शो मुळे मुंबईकरांचे लाईफ लाईन समजले जाणारे मेट्रो (Metro) काही तासाकरिता बंद राहणार आहे.
मुंबई मेट्रोची घाटकोपर ते जागृतीनगर ही सेवा आज सांयकाळी 6 वाजल्यापासून बंद राहणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही मेट्रो सेवा बंद राहणार असल्याचं मुंबई मेट्रोने स्पष्ट केलं आहे. मुंबई मेट्रोने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांचे मात्र हाल होण्याची शक्यता आहे. रोड शोच्या पार्श्वभूमीवर आज घाटकोपर परिसरातील अनेक रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आले असून दुसऱ्या मार्गाने उडवण्यात आली आहे.
असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शो चा मार्ग
अशोक सिल्क मिल येथून रोड शो सुरु होईल.
पुढे रोड शो सर्वोदय जंक्शन ओलांडून मार्गक्रमण करेल.
एमजी रोड येथे डावे वळण घेऊन रोड शो घाटकोपर पश्चिमेकडून पूर्वेला जाईल.
घाटकोपर पूर्वेकडे वल्लभ बाग जंक्शन येथे पोहचेल.
याठिकाणी असलेल्या पार्श्वनाथ जैन मंदिराजवळ रोड शो चा समारोप होईल.
विक्रोळी कांजूरमार्ग, पार्कसाईट, घाटकोपर, पंतनगर, टिळकनगर, चेंबूर, चुन्नाभटी, बीकेसी, खेरवाडी, वाकोला, विलेपार्ले, सहार, विमानतळ वाकोला, वांद्रे, वरळी दादर आणि शिवाजी पार्क परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर, सर्व प्रकारचे फुगे, पतंग आणि रिमोर्ट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्टवर बंदी असणार आहे.