3.7 C
New York

IPL 2024 : तीन जागांसाठी सहा संघांत चुरस

Published:

यंदाची आयपीएल (IPL 2024) स्पर्धा अत्यंत रंगतदार स्थितीत आली आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धा शेवटच्या टप्प्यावर आली असताना केवळ एकच संघ बाद फेरीसाठी (Qualifier) पात्र ठरला आहे. आणि उर्वरित तीन स्थानांसाठी सहा संघांमध्ये अत्यन्त अटीतटीची स्पर्धा आहे. राजस्थानबरोबरच चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद, दिल्ली कपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायन्ट्स या सहा संघांना बाद फेरीत जाण्याची संधी आहे.

IPL 2024 : राजस्थानला सर्वाधिक संधी

गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेला कोलकता नाईट रायडर्स या एकमेव संघाने १९ गुणांसह बाद फेरीत प्रवेश केला आहे. सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेला राजस्थान रॉयल्स संघाकडे १६ गुण आहेत. साधारणपणे १६ गुण असलेला संघ बाद फेरीत सहज प्रवेश करतो. पण, राजस्थानला यावेळी त्यासाठी अजून किमान एका विजयाची वाट पहावी लागणार आहे. राजस्थानचे अजूनही दोन सामने आहेत. त्यातील एक सामना गुणतालिकेत तळात असलेल्या पंजाब किंग्ज संघासोबत आहे तर दुसरा सामना प्रथम स्थानी असलेल्या कोलकताशी आहे. त्यामुळे राजस्थानला बाद फेरीत प्रवेश करण्याची सर्वाधिक संधी आहे.

हेही वाचा : सामन्याआधी टॉस होणार नाही? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..

IPL 2024 : सनरायजर्स हैदराबादला देखील तितकीच संधी

बाद फेरीत प्रवेश मिळवण्याची सर्वाधिक संधी असलेला दुसरा संघ म्हणजे सनरायजर्स हैदराबाद. सनरायजर्स हैदराबादकडे १४ गुण आहेत. त्यांचे अजूनही दोन सामने बाकी आहेत. त्यापैकी उद्या त्यांचा सामना स्पर्धेतून बाद झालेल्या पण लयीत असलेल्या गुजरात टायटन्स संघाशी आहे. तर दुसरा सामना १९ मे रोजी तळातील पंजाबशी आहे. यातील एक सामना जरी जिंकला तरी हैदराबादचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित होईल. पण हे दोन्ही सामने हैदराबाद हरला तर मात्र रनरेटवर गणित अवलंबून असेल. बाद फेरीत प्रवेश करू शकतो, असा तिसरा संघ आहे चेन्नई सुपर किंग्ज. या संघाकडे १४ गुण आहेत. त्यांचा एकच सामना शिल्लक असून १८ मे रोजी ते बंगळुरूशी भिडतील. हा सामना चेन्नईने जिंकला तर चेन्नईचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित होईल. पण, हा सामना बंगळुरूने जिंकला तर त्यांचेही १४ गुण होतील आणि त्यांच्या बाद फेरीत प्रवेश मिळवण्याच्या आशा कायम राहतील. अशा स्थितीत या दोन्ही संघांचा रनरेट महत्वाचा ठरणार आहे.

IPL 2024 : जर तरवर तिघांचे भवितव्य

बाद फेरीची संधी असलेला पाचवा संघ आहे दिल्ली कपिटल्स. या संघाकडे सध्या १४ गुण आहेत. आणि त्यांचे सर्व सामने झालेले आहेत. पण, जर तरवर दिल्लीलादेखील बाद फेरीत प्रवेशाची संधी आहे. लखनऊच्या संघालादेखील बाद फेरीत प्रवेशाची संधी आहे. लखनऊचे सध्या १२ गुण आहेत. त्यांचा एक सामना स्पर्धेतून बाद झालेल्या मुंबईशी आहे. हा सामना लखनऊने जिंकला तर १४ गुण असलेले किमान दोन संघ स्पर्धेत राहतील. त्यामुळे चौथ्या स्थानासाठी स्पर्धा अधिक चुरशीची असेल. पण, सद्यस्थिती पाहता राजस्थान, हैदराबाद आणि चेन्नई या तीन संघांना गुणतालिकेत स्थान मिळवण्याची सर्वाधिक संधी आहे, हे गुणतालिकेवरून स्पष्ट होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img