3.6 C
New York

Ghatkopar Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांचा आकडा 17 वर

Published:

मुंबई

घाटकोपर येथे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून (Ghatkopar Hoarding) झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला 50 तास उलटून गेले. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अजून बरेच जण आणि वाहनं ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर इस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर सोमवारी भलंमोठं होर्डिंग कोसळले. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक हे होर्डिंग कोसळले आणि पेट्रोल पंपावर असलेली वाहनं आणि अनेक जण याखाली अडकले. या दुर्घटनेला होऊन 50 तास झाले. सकाळपर्यंत या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला होता. आता मृताचा आकडा वाढून 17 वर गेला आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या दुर्घटनेत 75 जण जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img