‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. दिल्ली पोलिसांकडून तपास सुरु आहे मात्र अद्याप पोलिसांच्या हाती कुठलीही माहिती मिळाली नाही. या प्रकरणी पोलीस २६ एप्रिलपासून त्याचा तपास घेत आहेत, पण अजूनपर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आता दिल्ली पोलीस मुंबईला पोहोचले आहेत. तर दुसरीकडे गुरुचरणचे वडील आणि कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. चाहते आणि अभिनेत्याचे सहकलाकार देखील गुरुचरणची आतुरतेने वाटत बघत आहेत.
अशातच अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्युएन्सर फैजान अन्सारी (Faizan Ansari) याने मोठा दावा केला आहे. गुरुचरण सिंह बेपत्ता होणे हा केवळ एक पब्लिसिटी स्टंट आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी रचलेला डाव असल्याचं त्याने म्हटलं आहे. फैजानने गुरुचरण बेपत्ता होण्याच्या प्रकरणाची तुलना पूनम पांडेच्या ‘बनावट मृत्यू’शी केली आहे.
गुरुचरण सिंगच्या तपासासाठी दिल्ली पोलीस पोहोचले मुंबईला!
फैजान अन्सारी अनेकदा चर्चेत आला आहे. त्याच्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेला फैजान मीडियाशी बोलताना म्हणाला, ‘मला याबद्दल काही माहिती नव्हती, मी ती मालिका जास्त पाहत नाही. माझ्या एका मित्राने माझ्यासोबत एका न्यूज मीडियाची लिंक शेअर केल्यावर मला कळले. गुरुचरण सिंहने दिल्लीत बेपत्ता झाल्याची बातमी जाणीवपूर्वक प्रसिद्ध केली असल्याचं स्पष्ट मतंही त्याने व्यक्त केलं आहे. त्यानंतर त्याने त्याचा मोबाईल पंजाबमध्ये सोडला, असंही तो म्हणाला. पुढे त्याने म्हटलं की, हे सगळं केवळ प्रसिद्धीसाठी केलंय. मला कळतच नाही, की टीव्ही इंडस्ट्रीतील लोक असे का करतात?
फैजान अन्सारी पुढे म्हणाले, “गुरुचरणला शोधण्यासाठी किती मेहनत घेतली जाते. या संपूर्ण दिल्ली, पंजाब आणि मुंबई पोलीस गुंतलेले आहेत. काल दिल्ली पोलिसांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवर भेट दिली. प्रसिद्धीसाठी हे जाणूनबुजून करणे अत्यंत चुकीचे असून इंडस्ट्रीला लागेलेला हा डाग आहे. आणखी एक गोष्ट सांगतो की टीव्ही इंडस्ट्रीतील या कलाकारांनी स्वत:ला मोठे सेलिब्रिटी समजू नये.” फैजानने गुरुचरणच्या बेपत्ता होण्यावर पब्लिसिटी स्टंट म्हणत, इंडस्ट्रीला लागेलेला हा डाग आहे. असे देखील म्हटले.