23.1 C
New York

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Published:

मुंबई

निवडणूक आली की काहीजण मुंबई (Mumbai) महाराष्ट्रापासून तोडणार, अशी आवई उठवतात. मात्र मुंबईकरांच्या मतांवर डोळा ठेवून 25 वर्ष मुंबईची सत्ता उपभोगणाऱ्यांनी मुंबईसाठी काय केले, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उबाठावर (Uddhav Thackeray) केली. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची ही मुंबई आहे, ही महायुतीची मुंबई आहे. त्यामुळे जोवर चंद्र सूर्य आहेत तोवर मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही, अशी गर्जना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी चेंबूर येथे आयोजित जाहिर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

आपले सरकार आल्यानंतर मुंबईच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेतले. पहिला निर्णय घेतला दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबईचा निर्णय घेतला. मुंबईचे सुशोभिकरण केले जात आहे. आपला दवाखाना सुरु आहे. जागतिक दर्जाचे शहर करण्याचा प्रयत्न आपला आहे. कोळीवाड्यांचा विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मुंबईकर जो बाहेर फेकला आहे त्याला परत आणण्याचे काम आपले सरकार करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यासाठी राहुल शेवाळे यांना तिसऱ्यांदा संधी द्यायला हवी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी मतदारांना केले.

राहुल शेवाळे यांनी मागील दहा वर्षात मतदार संघातील एसआरएचे प्रकल्पांबाबत पाठपुरावा केला. आपण नगरविकास मंत्री असताना पुनर्विकासाचे नियम शिथिल केले, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणाले. एमएमआरडीए, म्हाडा, एमएसआरडीसी, एमआयडीसी या संस्थांच्या माध्यमातून रखडलेले प्रकल्प पूर्ण केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. पुनर्विकासाचे रखडलेले प्रकल्प पूर्ण केले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

येत्या 20 तारखेला धनुष्यबाणातून मतांचा असा वर्षाव करा, की मशाल विझली पाहिजे आणि धनुष्यबाण आणि राहूल शेवाळे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

काँग्रेस आता म्हणते महिलांना एक लाख रुपये देऊ पण महायुती सरकारने यापूर्वीच ती योजना सुरु केली. लेक लाडकी लखपती योजना, लखपती दिदी, महिला बचत गटांना कर्ज योजना, महिलांसाठी एसटीमध्ये सवलत देऊन सरकारने महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिले. नवीन संसद भवन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img