7.3 C
New York

Dharashiv : धाराशिव मध्ये सकल मराठा समाजाचे आंदोलन

Published:

धाराशिव

छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जयंती सभा दरम्यान पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्ज विरोधात आज धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या (Sakal Maratha Samaj) वतीने आंदोलन करण्यात आले आहे. या लाठीचार्जच्या विरोधात एकत्र येत मराठा समाजाच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेनंतर जिल्ह्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

धाराशिवमध्ये सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. धाराशिवमध्ये संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर मराठा समाजाच्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर टायर जाळले.

पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या कारणावरून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मराठा समाजाच्या आंदोलकांनी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलकांनी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोरील रस्त्यांवर टायर जाळले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img