3.8 C
New York

Kalyan Loksabha : कल्याणमध्ये SST पथकाकडून 7 लाखाची रोकड जप्त

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

कल्याण लोकसभा (Kalyan Loksabha) मतदार संघातील कल्याण (पूर्व) विधानसभा मतदार संघाच्या SST पथकाने मंगळवार तारखेला 7 लाख रुपये इतकी संशयास्पद रोख रक्कम जप्त केली. सदर SST पथकाची कल्याण (पूर्व) रेल्वे स्थानक येथून येणा-या-जाणा-या नागरीकांची तपासणी करुन त्यांच्याकडे आढळलेल्या बेकायदेशीर वस्तु जप्त करुन पुढील कायदेशीर कारवाई करणेबाबत नेमणूक करण्यात आली होती.

कल्याण (पूर्व) रेल्वे स्थानक येथे SST पथकातील कर्मचारी प्रवसी ब्रीजवरील टिकीट कांऊटरजवळ प्रवाशांच्या सामानाची तपासणी करीत असताना जयेश पोटे, राहणार-पुना लिंक रोड कोळसेवाडी, कल्याण (पूर्व) यांचेकडे असलेल्या बॅगेबाबत विचारणा केली. त्यावेळी बॅगेमध्ये रोख रक्कम असल्याचे संबंधितानी सांगितले परंतू, सदर रोख रक्कमेबाबत संबंधितांनी सविस्तर उत्तर दिले नाही,. तसेच रक्कमेच्या पुराव्याबाबत काहीही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे सदरची रक्कम रुपये 7 लाख पंचनामा करून , जप्त करुन कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशन, कल्याण (पश्चिम) येथे पोलीस ठाण्याच्या पितळी सीलने पेटीमध्ये स्वाक्षरी करुन सीलबंद केले अशी माहिती कल्याण (पूर्व) विधानसभा मतदार संघाचे SST पथकाचे (स्थिर सर्व्हेक्षण पथक) पथकप्रमुख दिपेश राठोड यांनी दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img