3.6 C
New York

Salman Khan: बिष्णोई समाज सलमानला करणार माफ?

Published:

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार प्रकरणाला आज महिना झाला. १४ एप्रिल रोजी दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून सलमानच्या घराबाहेर पहाटेच्या वेळी गोळीबार केला होता. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नव्हती. मुंबई पोलिसांकडून तपास सुरु असतानाच पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. अशातच मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सहाव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हरियाणा फतेहाबादमधून आरोपीला अटक करण्यात आली. हरपाल सिंग असे अटक आरोपीचे नाव असून तो 37 वर्षांचा आहे. त्याला सोमवारी (१४ मे) रोजी मुंबईच्या मकोका न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. परंतु, तुरुंगात असलेला गुंड लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई याने फेसबुकवर पोस्ट लिहित या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. काळवीर शिकार प्रकरणापासूनच बिष्णोई समाजाचा सलमानवर खूप राग आहे.


नेमकं प्रकरण काय?
सुपरस्टार सलमान खान वेगळ्याच कारणासाठी अंडरवल्डच्या रडारवर आला आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा चेला गोल्डी ब्रार यांनी गेल्या तीन वर्षांत सलमान खानला पाचवेळा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. रविवारी भल्या पहाटे सलमानच्या बांद्रा येथील घराबाहेर लॉरेन्स गॅंगच्या सदस्यांनी गोळीबार करत पुन्हा एकदा धमकीवजा इशारा दिला आहे. बिष्णोई गॅंग का सलमानच्या जीवावर उठली आहे?
सलमान खानची भूमिका असलेला ‘हम साथ साथ है’ हा चित्रपट १९९९ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वर्षभर आधी सारे कलाकार राजस्थानातील जोधपूरजवळ बवाड या गावात गेले होते. त्यावेळी हम साथ साथ हैच्या कलाकारांनी दोन चिंकारा अर्थात काळविटांची शिकार केल्याचे उघडकीस आले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सलमान खान, सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम कोठारी या कलाकारांविरोधात बिष्णोई समाजाने गुन्हा दाखल केला. काळविटाला वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण दिले गेलेले आहे. त्यामुळे त्याची हत्या करणे, त्याला इजा पोहोचवणे, तो पाळणे, बाळगणे हा गंभीर गुन्हा आहे. हि झाली कायद्याची बाजू.


पण, बिष्णोई समाज हा काळविटाला दैवी अवतार मानतो. बिष्णोई समाज हा निसर्ग पूजक आणि निसर्गाची सेवा करणारा आहे. वन्यप्राण्यांची हत्या करणे हा केवळ गुन्हा नाही, तर त्यांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवणे आहे, असे हा समाज मानतो. त्याचे कारणही तसेच आहे. धर्मगुरू भगवान जांबेशवर अर्थात जमबाजी यांनी काळवीटाच्या रूपात पुनर्जन्म घेतल्याची बिष्णोई समाजाची धारणा आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची हत्या किंवा वृक्षतोड ही बिष्णोई समाजाच्या दृष्टीने भावनेला ठेच पोहोचवणे आहे.

‘बिग बॉस ओटीटी ३’ चं होस्टिंग सलमान करणार नाही? कोण आहे नवा होस्ट?


या धरणांमुळे बिष्णोई समाज सलमान खानवर प्रचंड नाराज आहे. त्यातच २६ वर्षे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने बिष्णोई समाज कमालीचा दुखावला गेला आहे. या नाराजीतूनच लॉरेन्स बिष्णोई गॅंगने सलमान खानचा काटा काढण्याच्या इराद्याने गेल्या तीन वर्षांपासून त्याला सातत्याने धमकी देण्यास सुरुवात केली आहे. २०२२ मध्येच पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची बिष्णोई गॅंगने हत्या केली. पुढच्या दोनच दिवसात सलमान खानचे वडील सलीम खान सकाळी फिरायला गेल्यावर बांद्रा बँडस्टॅन्ड येथे सलमानची अवस्था मुसेवालाप्रमाणे करू, अशी धमकी देणारी चिट्ठी मिळून आली. त्यानंतर सलमानला बिष्णोई गॅंगने पाचवेळा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सरकारने सलमान खानला वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. तरीही बिष्णोई गॅंग सलमानच्या जवळ पोहोचत आहे, हे विशेष.


अशातच बिष्णोई समाज अखेर सलमानला माफ करण्यास तयार झाल्याचं कळतंय. नुकतंच सलमानची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सोमी अलीने बिष्णोई समाजाकडे विनंती केली होती. या विनंतीला प्रतिक्रिया देत अखिल भारतीय बिष्णोई महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी सांगितलं की त्यांचा समाज सलमानला माफ करण्यासाठी तयार आहे.

अनुज थापरचा शवविच्छेदन अहवाल समोर!


एका मुलाखतीत देवेंद्र बुडिया म्हणाले, “सोमी अलीच्या आधी अभिनेत्री राखी सावंतनेही माफी मागितली होती. मात्र जो आरोपी आहे, सलमान खान त्याने खुद्द बिष्णोई समाजाची माफी मागितली पाहिजे. ते देखील मंदिरासमोर येऊन माफी मागितल्यास बिष्णोई समाज त्यांना माफ करेल.” असा इशारा बिष्णोई समजणे सलमानला दिला आहे. पुढे म्हणाले,”“आमच्या 29 नियमांपैकी एक नियम हा क्षमादय हृदय आहे. आमचे मोठमोठे महंत, साधू, नेते, बिष्णोई समाजाचे प्रमुख पंच आणि तरुण हे सर्व मिळून विचार करून त्याला माफ करू शकतील. मात्र त्याला मंदिरासमोर येऊन शपथ घ्यावी लागेल की अशी चूक तो पुन्हा कधी करणार नाही आणि नेहमी पर्यावरण तसंच वन्यजीवांचं रक्षण करेल. असं झाल्यास आम्ही त्याला माफ करू शकतो.” मात्र सलमान यावर काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचं लक्ष आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img