21 C
New York

Narendra Modi : पंतप्रधान मोदी ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढणार

Published:

वाराणसी

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आज वाराणसी लोकसभा (Varanasi Lok Sabha) मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघातून तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी यांनी उमेदवारी अर्ज (Nomination Form) दाखल केला आहे. भाजपच्या (BJP) वतीने यावेळी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडणूक लढवली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी गंगा पूजन केले. तसेच कालभैरव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. वाराणसी लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी कडून पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

पंतप्रदान मोदी यांनी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 2014 पासून पीएम मोदी सलग तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत. पीएम मोदींच्या नामांकनावेळी सीएम योगी आदित्यनाथ उपस्थित होते. PM मोदींच्या नामांकनात 12 NDA राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे अनेक बडे नेते सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img