19.7 C
New York

Otur News : डिंगोरे परिसरात गारपिटीसह पावसाची हजेरी

Published:

रमेश तांबे, ओतूर

जुन्नर तालुक्यातील (Otur News) डिंगोरे परिसरात सोमवारी दुपारी अवकाळी पावसाने (Uncertain Rainfall) दमदार हजेरी लावली, सकाळपासूनच दमट वातावर होते, दुपारनंतर आकाश ढगांनी गच्च भरले होते.चार ते सव्वाचार वाजता, या परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात होऊन गारपीट झाली. वादळी वारा आणि गारपिटीमुळे या परिसरातील शेतकऱ्यांचा भाजीपाला पिकासह आंब्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. 

डिंगोरे,उदापूर परिसरात सोमवारी दि.१३ रोजी पडलेला अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाल्याने या परिसरातील शेतकऱ्यांच्या कोबी, फ्लॉवर, मिरची, काकडी, टोमॅटो, कोथिंबीर आदी पिकांचे गारपिटीमुळे नुकसान झाले असल्याचे येथील शेतकरी जालंदर उकिर्डे व संदीप शिंगोटे यांनी सांगितले.

वादळी वाऱ्यासह गारपिट होऊन सुमारे अर्धा तास पडलेल्या पावसामुळे टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची, काकडी पिकांची पाने फाटली तसेच पिकांच्या फांद्या तुटून पाने गळून गेली आहेत. काढणीसाठी आलेल्या कोथिंबीरीचेही नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दुपारी चार वाजण्याच्या सूमारास कोपरे, मांडवे, मुथाळणे, हिवरे बुद्रूक, ओझर याठिकाणी देखील सोसाट्याच्या वाऱ्यासह,पाऊस पडून गारपीट झाली. दरम्यान,तालुक्यात जुन्नर,पांगरीमाथा,आलमे,बल्लाळवाडी, नेतवड, माळवाडी, धोलवड, ठिकेकरवाडी, हिवरे खुर्द,ओतूर रोहोकडी, मांदारणे,आंबेगव्हाण, पाचघर, चिल्हेवाडी परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img