मुंबई
कोणत्या ना कोणत्या कारणास्तव नेहमीच प्रसिद्धीस असलेल्या अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघाच्या खासदार आणि महायुतीच्या उमेदवार खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या मुंबईतील (Mumbai) घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नोकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या मुंबईतील खार पश्चिम मधील घरी चोरी झाली आहे. राणा दांपत्यांच्या घरात दोन लाख रुपयाची रोकड चोरी झाल्याची माहिती पोलिसांना दिलेल्या तक्रारीत दिली आहे. राणा दाम्पत्यांच्या घरात काम करणारे नोकरचा या चोरीमागे त्यांचा हात असल्याचं म्हटले आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कडून नोकरचा शोध सुरू केला आहे.
नवनीत राणा यांच्या घरी गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या नोकर अर्जुन मुखिया बिहारचा रहिवाशी असून तो थोडी निमित्त गावी निघून गेला मात्र तो अद्यापही परत आला नाही त्यामुळे त्याच्या अटकेसाठी खार पोलिसांची एक पथक बिहारला रवाना झाले आहे. या प्रकरणात अधिक तपास मुंबई पोलीस करत आहेत.