26 C
New York

Mrunal Dusanis: शशांक-मृणालच्या भेटी मागचं खरं कारण आलं समोर!

Published:

मराठी मालिकाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) तब्ब्ल चार वर्षांनी भारतात परतली आहे. अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर मृणालने आता पुन्हा एकदा दमदार कमबॅक करण्याची इच्छा देखील व्यक्त केली. चाहते तसेच अनेक सहकलाकारांकडून तिच्या कमबॅकमुले आनंद व्यक्त केला जातं आहे. अनेकांनी तिची भेट घेत असल्याचं पाहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वी अभिनेता शशांक केतकरने (Shashank Ketkar) मृणालची भेट घेतली. त्याच्या या भेटीचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. चाहत्यांकडून सोशल मीडियावर या फोटोला उत्तम प्रतिसाद देखील मिळाला.


कलर्स मराठी वाहिनीवरील ‘हे मन बावरे’ या मालिकेत दोघे एकत्र झळकले होते. प्रेक्षकांकडून या जोडी खूप पसंती मिळाली होती. इतकचं नव्हे तर कलर्स मराठी अवॉर्ड्समध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार देखील मिळाला होता. मालिकेनंतर चाहते या लाडक्या जोडीला मिस करत होते. पण या दोघांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा चाहते त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक झालेत.

‘ये रे ये रे पैसा 3’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


मृणालने दिलेल्या एका मुलाखतीत शशांक आणि तिच्या भेटीमागचं खरं कारण सांगितलं आहे. “आमची भेट अगदी सहज होती,” अशी ती म्हणाली. माझ्याकडे आमचा तो फोटो होता, पण मी तो पोस्ट करणार नव्हते. मात्र त्याने अचानक तो फोटो पोस्ट केला आणि त्याने मला त्या पोस्टवर कोलॅबोरेशनसाठी इनव्हाईटही केलं. मला अपेक्षित नव्हता पण आमची ती भेट बरीच व्हायरल झाली. मी चार वर्षांनी परत आल्यानंतर शशांकला भेटले, त्याच्या बायकोला भेटले, त्याच्या मुलाला भेटले. त्यानंतर मलाही ते छान वाटलं, माझे जुने दिवस मला आठवले.


दरम्यान शशांक केतकरने पोस्ट केलेल्या फोटोच्या कॅप्शनने विशेष लक्ष वेधून घेतलं होतं. शशांकने कॅप्शन दिलं होतं की, “सिद्धार्थ मिट्स अनु.. मृणाल वेलकम बॅक. हे मन बावरे मालिका संपून 4 वर्ष झालीत पण अजूनही परत परत बघतो अशी प्रतिक्रिया अनेकदा मिळते, आजही! मग मंडळी ही जोडी पुन्हा बघायला आवडेल का?” शशांकच्या या पोस्टवर कंमेंट्सचा पाऊस पडला. त्यांच्या भेटीचे फोटोचे व्हायरल झाले होते. चाहते दोघांची जोडी ऑनस्क्रीन बघण्यासाठी उत्सुक आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img