23.1 C
New York

Maratha Reservation : जरांगे पाटलांची पुन्हा उपोषणाची घोषणा

Published:

मुंबई

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता सातत्याने आंदोलन करणारे आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार काढला आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) मतमोजणीच्या दिवशीच मनोज जरंगे यांनी 4 जून पासून पुन्हा आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रामुख्याने केलेली मागणी सगेसोयरे याकरिता पुन्हा एकदा मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासन पूर्ण न केल्याने मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या पूर्वेदेखील उपोषण सुरू केले होते मात्र स्थानिक लोकांच्या आग्रहानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते आता पुन्हा एकदा मनोज जरांगे 4 जून पासून उपोषण सुरू करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांची 8 जून रोजी नारायण गडावर सभा होणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ते सगेसोयरेची मागणी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील करत असल्याचे सांगितले जात आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, मराठ्यांमुळे मोदींना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सभा घ्याव्या लागल्या. त्यामुळेच मोदी गोधड्या टाकूनच महाराष्ट्रात होते. मोदींवर ही वेळ फडणवीस आणि त्यांच्या चार-पाच लोकांमुळे आली असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही नाही. मात्र, जोपर्यंत सगेसोयरे आणि ओबीसी मराठा एकच असल्याचा अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार आहे. इतकेच नाही तर तसा निर्णय झाला नाही तर येणारी विधानसभा निवडणूक लढवणार. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही राजकारणात पडणार नसल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही कोणाचाही प्रचार केला नाही. किंवा कोणालाही निवडून आणा, असे म्हणालेलो नाही. आमचा महाविकास आघाडीला किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता. मात्र, मी समाजाला कोणाला पाडायचे ते पाडा असे, म्हणालो होतो. त्यामुळे कोणाला पाडायचे हे समाजाला कळाले होते, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img