21 C
New York

Ghatkopar : होर्डिंग प्रकरणात ठाकरेंच्या मदतीला महायुतीचा नेता

Published:

मुंबई

घाटकोपर (Ghatkopar) मधील होर्डिंग (Hoarding) कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकारात भाजपच्या (BJP) नेत्यांकडून पेट्रोल पंप मालक आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा फोटो पोस्ट करत ठाकरेंना घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता यावर महायुतीतील (Mahayuti) अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ठाकरेंच्या बाजूने उभे राहत राज्य सरकारवरच हल्लाबोल केला आहे.

मुंबईत सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर परिसरातील होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला होता. तर यात अनेक जण जखमी झाले आहे. या प्रकरणातील होर्डिंग आणि पेट्रोल पंप मालकाचा उद्धव ठाकरे यांच्या सोबतचा फोटो भाजपचे नेते राम कदम यांनी ट्विटरवर शेअर करत उद्धव ठाकरे यांना घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावर आता अजित पवार गटाचे नेते आणि राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवरच पलटवार केला आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, राज्यात सरकार आमचं आहे. मुंबई महानगरपालिका सुद्धा सध्या आमचीच आहे. मग त्या होर्डिंग प्रकरणाचा उद्धव ठाकरे यांच्याशी काय संबंध आहे. राजकीय नेत्यांना अनेक लोक भेटण्यास येतात. व्यापारी सगळ्यांकडे येतात. मिठाई घेऊन येतात आणि फोटो काढतात. यामुळे यामध्ये उद्धव ठाकरे यांचा संबंध नाही. या प्रकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

छगन भुजबळ म्हणाले की, मुंबईत एअर पोर्टकडे जाताना असे अनेक हॉर्डिंग दिसतात. ते होर्डिंग समांतर हवे होते पण ते रस्त्यावर आहेत. त्यांचे वजन सुद्धा भरपूर आहे. हे सगळे अनधिकृत आहेत. त्या सर्व होर्डिंगची चौकशी झाली पाहिजे. हे बेकायदेशीर होर्डिंग काढण्यासाठी वेळ कशाला काढता? आता सर्व प्रशासकीय संस्थांनी धडक कारवाई करण्याची गरज आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, होर्डिंगमुळे मृत्यू झालेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचा गुन्हा काय होता? शासन 5 लाख देईल? म्हणजे संपलं का? या प्रकरणाची चौकशी करुन कठोर शिक्षा होण्याची गरज आहे. जितका आकार असायला हवा होता त्या पेक्षा खूप मोठा आकार होर्डिंगचा होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img