मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा (Mumbai Loksabha) मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची मुंबई (Mumbai) उद्या दि.15 मे रोजी भाजपच्या (BJP) वतीने शक्ती प्रदर्शन करत रोड शो (Road Show) देखील करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून (Mumbai police) वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहे.
मुंबईतील उमेदवारांचा प्रचार करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 15 मे आणि 17 मे रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत मुंबईत रोड शो देखील करणार आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक मार्ग बंद राहणार आहेत.
नरेंद्र मोदी यांचा उद्या मुंबईत रोड शो असल्यामुळे उद्या दुपारी 2 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत मुंबईच्या एल.बी.एस मार्ग बंद राहणार आहे. तसेच माहुल घाटकोपर रोडवरील मेघराज जंक्शन ते आर.बी कदम जंक्शन पर्यंत उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूला वाहतूक दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून संपूर्ण एल.बी.एस मार्ग व एल.बी.एस मार्ग ला जोडणारा मुख्य रस्त्या पासून 100 मीटर अंतरापर्यंत 14 आणि 15 तारखेला नो पार्किंग करण्यात आला आहे.
‘या’ मार्गात तात्पुरता बदल
अंधेरी घाटकोपर मार्ग वरील घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन दरम्यान उत्तर व दक्षिण वाहिनीवरील वाहतूक
गोळीबार मैदान व घाटकोपर मेट्रो असताना जंक्शन येणारी वाहतूक
हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्स येथून गुलाटी पेट्रोल पंप जंक्शन कडे येणारी वाहतूक