बॉलीवूडचा जग्गूदादा म्हणून अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) ओळखला जातो. आपल्या अभिनयाने, कामाने स्थान मिळवणारा अभिनेता वेगळ्याच अंदाजासाठी ओळखला जातो. त्याची बोलण्याची लय आणि स्टाईलसाठी तो खास चर्चेत असतो. त्यामुळे बॉलीवूडच्या इतर अभिनेत्यांपेक्षा जॅकी श्रॉफ वेगळा ठरतो. तो आपल्या बोलण्यात भिडू या शब्दाचा वापर करतो. आता याच शब्दावरून जग्गूदादाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. अभिनेता जॅकी श्रॉफने दिल्ली हायकोर्टात (Delhi Highcourt) याचिका दाखल केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
खासगी आणि सार्वजनिक अधिकारांच्या संरक्षणा जॅकी श्रॉफने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. यासाठी त्याने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली. त्याशिवाय, पूर्वसंमतीशिवाय आपले नाव, फोटो, आवाज आणि ‘भिडू’ शब्द वापरणाऱ्यांविरोधात खटला दाखल केला आहे. याबाबत जॅकी श्रॉफने म्हटले की, एआय ॲप्स आणि सोशल मीडियाशिवाय इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर त्याचा आवाज, फोटो किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही बाबी वापरण्यापूर्वी त्याच्याकडून परवानगी घ्यावी, असे निर्देश हायकोर्टाने द्यावेत अशी मागणी केली.
बिष्णोई समाज सलमानला करणार माफ?
याप्रकरणी १५ मे रोजी सुनावणी होणार आहे. जॅकी श्रॉफने दाखल केलेल्या याचिकेनुसार, विडंबनात्मक कलाकृतीसाठी आपला आवाज, व्यक्तीमत्त्वाचा वापर करण्यास किंवा पॅरोडी करण्यास मनाई नाही. मात्र, चुकीच्या गोष्टींसाठी किंवा बदनामीकारक कटेंट तयार करण्यासाठी जॅकी श्रॉफचा आवाज, व्यक्तीमत्त्वाचा वापर होता कामा नये असे