मुंबई
मुंबईत (Mumbai) काल झालेल्या वादळी मुळे घाटकोपर (Ghatkoper) परिसरातील होर्डिंग (Hoarding) कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत (Accident) आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचे नोंद करण्यात आली आहे. तर 70 पेक्षा अधिक जखमी रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. अग्निशामक दलाकडून अद्यापही बचाव कार्य सुरू आहे. या प्रकरणात होर्डिंग मालक आणि पेट्रोल पंप मालका विरोधात मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) सदृश्य मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता या प्रकरणाला राजकीय वळण आले असून भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी होर्डिंग मालकाचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा फोटो पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
घाटकोपर परिसरात झालेल्या होर्डिंग दुर्घटनेत भाजपचे आमदार राम कदम यांनी उडी घेत या दुर्घटनेप्रकरणी थेट उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. राम कदम यांनी उद्धव ठाकरे आणि पेट्रोल पंप मालक भावेश भिडे यांचा फोटो ट्विट केला आहे. भाजप नेते राम कदम यांनी या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
राम कदम यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे.. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात.. मनाला चीड आणणारे हे चित्र.. त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते हे या चित्रावरून स्पष्ट होते.. टक्केवारी साठी कोविड काळातले खिचडी चोर.. कफनचोर.. आजही टक्केवारी साठी 14 लोकांचे नाहक बळी घेता आहेत.. कुठे फेडणार हे पाप..?