काल (१४ मे) रोजी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मुंबईकरांची तारंबळ उडाली होती. अशातच घाटकोपर परिसरात एक धक्कादायक घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे एक अवाढव्य होर्डिंग (Ghatkopar Hoarding) कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेलेल्या एका 24 वर्षीय तरुणावर काळाने घाला घातला. या तरुणाचे नाव भरत राठोड असे आहे.
भरत राठोड (Bharat Rathod) हा मेडिकलमध्ये डीलिव्हरीचं काम करायचा. पेट्रोल भरण्यासाठी तो पेट्रोल पंपावर गेला होता. त्याचवेळी होर्डिंग कोसळ आणि भरतचा मृत्यू झाला. भरत त्याच्या कुटुंबाचा एकटाच आधार आहे. त्याला छोटा भाऊ असून आठवडाभरापूर्वीच वडिलांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना राजवाडी रुग्णालयात दाखल केले होते. दोनच दिवसापूर्वी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याची आई कोरोनाने गेली. त्यामुळे घराचा आधार असलेला भरत हरपल्यामुळे राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भरत घाटकोपर वेस्टमधील गोळीबार रोड परिसरातील रहिवासी आहे. सकाळी कामासाठी ती घराबाहेर गेला तो परतलाच नाही.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला ; मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि घाटकोपरच्या घटनेची पालिका प्रशासन यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली. मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक (NDRF) यांना देखील पाचारण करण्यात आले. मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील बचावकार्य सुरू आहे. मात्र भरतच्या निधनाने राठोड कुटुंबाचा आधार हरपला.