11.6 C
New York

Disha Vakani: दयाबेन परत येणार?

Published:

गेल्या १६ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मधल्या ‘दया भाभीची’ प्रेषक आतुरतेने वाट बघत आहेत. फक्त जेठालाल नाही तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचे लाखो चाहते आहेत. दया बेन फेम दिशा वाकाणी (Disha Vakani) गेल्या काही वर्षांपासून शोमध्ये नाही. दिशाने तिच्या प्रेग्नंसी साठी शोमधून ब्रेक घेतला होता.


निर्मात्यांनी अनेकदा दिशाला पुन्हा शोमध्ये कमबॅक करण्याची विनंती केली. मात्र तिने कुटुंबाला प्राधान्य देत शोमध्ये येण्यास नकार दिला. मालिकेत तिच्या पुनरागमनाची उत्सुकता असताना अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने (Jennifer Mistri) मोठा खुलासा केला आहे. २०१७ पासून दिशेने मालिकेमधून ब्रेक घेतला परंतु ती पुन्हा झळकळीच नाही. अशातच रोशन सोडी फेम जेनिफर मिस्त्रीने मोठा खुलासा केला आहे.

गुरुचरण सिंगच्या तपासासाठी दिल्ली पोलीस पोहोचले मुंबईला!


एका व्हिडिओमध्ये जेनिफरने म्हंटले की, “शोचे निर्माते गेल्या तीन वर्षांपसून दयाच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेत आहे. एक मुलगी १००% दयाबेन सारखी दिसते. निर्मात्यांनी तिला दिल्लीहून मुंबईला ऑडिशनसाठी बोलावलं आहे. तिचं वय २८ ते २९ वर्ष असेल. पण ती हुबेहूब दयाबेन सारखी दिसते. कदाचित याच कारणांमुळे तिची निवड झाली असेल.”

I know it’s far beyond saving….but le ayo yar
byu/i-hades inTMKOC


जेनिफर म्हणाली, “आमची त्या मुलीसोबत मॉक टेस्टही झाली आहे. तिची दिलीप म्हणजेच जेठालाल आणि टप्पूसोबत देखील मॉक टेस्ट झाली आहे. तिचा चेहरा थोडा वेगळा आहे. परंतु जेव्हा ती दयाच्या गेटअपमध्ये येते तेव्हा हुबेहूब दया दिसते. पूर्वीच्या दयाबेन आणि आताच्या दयाबेनमध्ये तुम्हाला काही फरक दिसणार नाही.” मात्र चाहत्यांकडून दिशाचं परत येणार नाही ना? असा प्रश्न विचारला जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img