21 C
New York

Rahul Gandhi : लग्न कधी करणार? भरसभेत राहुल गांधीना प्रश्न

Published:

देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वारे वाहत आहे. या निवडणुकीत काँग्रेस (Congress) पक्षाला जास्तीत जास्त जागा जिंकून देण्यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) संपूर्ण देशात जोरदार प्रचार करताना दिसत आहे. आज राहुल गांधी रायबरेली मतदारसंघात (Rae Bareli Election) होते. येथे एका जाहीर सभेत गर्दीतून राहुल गांधींना तुम्ही लग्न कधी करणार असं प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देत राहुल गांधी म्हणाले, आता लवकर करावे लागेल.

Rahul Gandhi रायबरेलीशी असलेले नाते शंभर वर्षांचे

राहुल गांधी रायबरेली मतदारसंघातुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. आज राहुल गांधी यांनी महाराजगंज येथील फेअर ग्राउंडवर एका जाहीर सभेला संबोधित केले. या सभेत त्यांना लग्न कधी करणार असं प्रश्न विचारण्यात आला तेव्हा राहुल गांधींनी या प्रश्नाचा उत्तर देत आता लवकर करावे लागेल. असं म्हणत तेथून निघून गेले. यावेळी राहुल गांधींसोबत प्रियांका गांधी वाड्राही उपस्थित होते. या सभेत राहुल गांधी म्हणाले, आमचे रायबरेलीशी असलेले नाते शंभर वर्षांचे आहे. आमचे आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रायबरेलीतील शेतकरी आणि मजुरांसोबत आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती.

पालघरमध्ये शाहांनी एकेक मुद्दा केला क्लिअर

Rahul Gandhi मी रायबरेलीतून निवडणूक लढवण्यासाठी आलो

काही वेळापूर्वी सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या संभाषणाची माहिती देताना राहुल गांधी म्हणाले की, आईच मार्ग दाखवते, जी संरक्षण करते . ते म्हणाले की, त्यांच्या आईसोबत इंदिरा गांधींनीही त्यांना मार्ग दाखवला आणि त्यांचे रक्षण केले. मी तुम्हाला हे सांगतोय कारण हे माझ्या दोन्ही मातांचे कार्यस्थळ आहे, त्यामुळेच मी रायबरेलीतून निवडणूक लढवण्यासाठी आलो आहे. असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. रायबरेली लोकसभा मतदारसंघातून सोनिया गांधी 1999 मध्ये रायबरेलीमधून खासदार म्हणून निवडून आल्या आणि 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्येही त्यांनी ही जागा राखली. मात्र 2024 मध्ये त्यांनी निवडणूक ना लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसकडून रायबरेलीमधून राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रायबरेली लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img