लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha elections) अवघ्या काही महिन्यांनी राज्यात विधानसभा निडणुका होणार आहे. त्यासाठीही आतापासूनच रणनीती ठरू लागली आहे. अशातच आता उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray) विधानसभा निवडणुकीसंदर्भात सूचक विधान केलं.
खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’साठी उद्धव ठाकरे यांची दोन भागात मुलाखत घेतली. या मुलाखतीचा दुसरा भाग सोमवारी प्रसिद्ध झाला. या भागात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील अन्य नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले, माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सहभागी होते. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यावेळी बंगालच्या फाळणीला पाठिंबा दिला होता. आज मला जे लोक औरंगजेबचा फॅन म्हणतात, त्यांच्या वडिलांची विचारसरणी काय होती, असा असा खडा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
भाजपसोबत जाणार नाही…
पुढं बोलतांना ते म्हणाले, मी महाराष्ट्राच्या अभिमानाचे वेगळे मंदिर बांधतोय. त्यामुळे मला अशी फटींची, खिडक्यांची गरज नाही. ही लढाई जनतेची आहे. अन्यथा हे महाराष्ट्राला खतम खरतील. आता भाजपकडून ऑफर दिली तरी आता भाजपसोबत जाणार नसल्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी जाहीर घेतली आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यावर आपण पुन्हा मुंबई आणि महाराष्ट्राचे गेलेलं वैभव मिळवून देऊ, अशा आशयाचं विधान केलं. त्यामुळं त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. “जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार येणार. आधी केंद्रात आणि मग राज्यात येणार. मी महाराष्ट्राचे आणि मुंबईचे लुटलेले वैभव परत आणेन. आर्थिक केंद्रही मी नव्याने उभारून दाखवने, असंउ उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच भाजपच्या मशिनला ज्या शिवसेनेनं करंट दिला, तो करंटच काढला तर वॉशिंग मशीन कशी चालेल, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.
बाळासाहेबांची शिवसेना म्हणण्यापूर्वी मोदी – शाहांनी बाळासाहेबांना ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हटलं पाहिजे. कारण त्यांना अजून कोणाही हिंदूचा कैवारी म्हणत नाही. त्यांच्या कार्यकाळाला 10 वर्षे उलटूनही हिंदूंना मुंबई आणि महाराष्ट्रात आक्रोश मोर्चे काढावे लागतात. म्हणजे त्यांच्या राज्यात हिंदू सुरक्षित नाहीत, असे परखड मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.