23.1 C
New York

Sanjay Raut : राऊतांच्या ‘त्या’ आरोपांवर शिंदे गटाचं उत्तर, म्हणाले…

Published:

राज्यातील विविध भागात भाजपचे (BJP) स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीच पैसे वाटल्याचा संशय व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या २ तासांच्या दौऱ्यासाठी जड बॅगा आणल्या आहेत. त्यामुळे या बॅगातून कोणता माल नाशिकला पोहोचला? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

सोमवारी सकाळी संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. हा व्हिडिओ नाशिकमधील आहे. या व्हिडिओत मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरमधून खाली उतरताना दिसत आहेत. संजय राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, नाशिकमध्ये रात्रीचे खेळ चाले. नुसता पै पाऊस… दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलीस का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचवला? निवडणूक आयोग फालूत नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरू आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर केलेल्या या आरोपावर आता सत्ताधारी नेते काय प्रतिक्रिया देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.

Sanjay Raut आपण किती बेअ** आहोत हे ठासून सांगण्याचा

शिंदे गटाचे प्रवक्ते शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे संभाजीनगरला येताना किती बॅगा घेऊन आले होते हे तुम्हाला (प्रसारमाध्यमांना) माहिती आहे का? प्रसारमाध्यमांनीदेखील ते पाहिलं असेल. परंतु, आम्ही त्यांच्यावर काही आरोप केले नाहीत. या बॅगांवरून पैशांचा आरोप करणे हा संजय राऊत यांचा नवा जावईशोध आहे. आपण किती बेअ** आहोत हे ठासून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे.

संजय राऊत म्हणाले होते की, सत्ताधारी नेते निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा पाऊस पाडतायत. संजय शिरसाट यावर म्हणाले, कुठलीही व्यक्ती पैशांचा पाऊस पाडून निवडणूक जिंकू शकत नाही. असं जर असतं तर माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस आमदार झाला नसता. टाटा-बिर्ला पंतप्रधान झाले असते जर पैशांच्या पावसाने निवडणुका जिंकता येत असत्या तर . खरंतर निवडणुकीतील आपला पराभव दिसू लागल्यावर त्यांनी आतापासूनच कारणं सांगायला सुरुवात केली आहे.

उद्धव ठाकरे मविआचे CM पदाचे उमेदवार?

Sanjay Raut व्हिडिओमध्ये काय आहे?

या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरताना दिसत आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून बाहेर आले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या अंगरक्षकांचा ताफा आहे. या ताफ्यात दोन अंगरक्षकांच्या हातात सुटकेस आणि बॅग दिसत आहे. या पिशव्यांमध्ये नेमके काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, दोन तासांच्या नाशिक दौऱ्यासाठी मुख्यमंत्री इतक्या बॅगा का घेऊन आले, असा सवाल करत संजय राऊत यांनी पैसे वाटपाची शंका उपस्थित केली.दोनच दिवसांपूर्वी संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शेवटची फडफड सुरू असल्याची टीका केली होती. तसंच देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील कच्चे मडके असल्याची टीका केली होती. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी टेम्पो भरून पैसे आणून दिले तरी काही होणार नाही. अजित पवारांच्या उमेदवारांची निवडणूक संपली असल्याने ते आता मोकळे झाले आहेत. मात्र शिंदे यांची फडफड सुरूच आहे,असं राऊत म्हणाले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img