3.8 C
New York

Amit Shah : पालघरमध्ये शाहांनी एकेक मुद्दा केला क्लिअर

Published:

देशात लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) चौथ्या टप्यांत मतदानाची प्रक्रिया सुरु आहे. अद्याप राज्यातील काही मतदारसंघाचं मतदान बाकी असून येत्या 20 मे रोजी पाचव्या टप्यांत इतर जिल्ह्यांतील मतदान पार पडणार आहे. अशातच पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा (Hemant Sawara) यांचा झंझावात प्रचार सुरु आहे. पालघरमध्ये आज भाजपचे नेते अमित शाहा Amit Shah यांच्या उपस्थितीत हेमंत सावरा यांची प्रचारार्थ आयोजित सभा पार पडली. या सभेत संबोधिक करताना अमित शाह यांनी विरोधकांच्या एकेक मुद्द्यावर भाष्य करीत सडकून टीका केलीयं.

अमित शाह म्हणाले, विरोधकांकडे पंतप्रधानपदासाठी चेहरा नाही. इंडिया आघाडीत शरद पवार, उद्धव ठाकरे, उदयनिधी स्टॅलिन, राहुल गांधी कोणीही पंतप्रधानपदासाठी तयार नाहीत. त्यावर ते आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी अनेक चेहरे असून आळीपाळीने पंतप्रधान बनवणार असल्याचं विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. शरद पवारसाहेब हे काही दुकान नाही, कोरोना, पाकिस्तानला उत्तर, आतंकवादाला तुम्ही शकत नाहीत, अशी सडकून टीका अमित शाह यांनी विरोधकांवर केलीयं.

उद्धव ठाकरेंना लाज कशी वाटत नाही..


26/11 च्या हल्ल्यातील कसाबबद्दल काँग्रेसचे नेते बोलत आहेत, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसत आहेत, तुम्हाला लाज वाटत नाही का? पाकव्याप्त काश्मीरबाबत इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला बोलतात, हे तुम्हाला मान्य आहे का? तुम्हाला घाबरायचं असेल तर घाबरा, पण पाकव्याप्त काश्मीर भारताचं होतं, आहे आणि राहणारच. आम्ही भाजपवाले घाबरणारे नाहीत, या शब्दांत शाहांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं. ज्या काँग्रेसच्या मांडीवर तुम्ही बसलेत ते म्हणतात आम्ही ट्रीपल तलाक पुन्हा परत आणणार आहोत, पण तुम्ही सहमत आहात का? ते तुम्ही सांगणार नाहीत, कारण तुमच्या डोक्यात सत्तेची महत्वाकांक्षा आहे, अशी सडकून टीकाही शाहा यांनी यावेळी केलीयं.

दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, पण विरोधक त्यांच्यावर चार आण्यांचाही आरोप लावू शकत नाहीत. मुंबईत हल्ले झाले त्यावर काँग्रेसचे नेते, सोनिया गांधी मनमोहन सिंग काहीही करु शकले नाहीत. पण जम्मू काश्मीरमध्ये हल्ला झाल्यानंतर 10 दिवसांत सर्जिकल आणि एअरस्ट्राईक करुन आम्ही उत्तर दिलं असल्याचं अमित शाहांनी यावेळी सांगितलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img