22.3 C
New York

Satish Joshi : सतीश जोशी काळाच्या पडद्याआड; स्टेजवर घेतला अखेरचा श्वास!

Published:

मराठी सिनेसृष्टीसाठी अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. जेष्ठ मराठमोळे अभिनेते सतीश जोशी (Satish Joshi) यांचं निधन झालं आहे. रंगोत्सवच्या स्टेजवर सतीश जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता राजेश देशपांडे यांनी वृत्त दिले. राजेश देशपांडे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. संपूर्ण मराठी सिनेसृष्टी वर शोककळा पसरली आहे. फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये “आमचे ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे आज रंगोत्सवात स्टेजवरच निधन झाले आहे. जाण्यापूर्वी त्यांनी अभिनय पण केला होता. ओम शांती ओम.” अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

 ‘सृजन द क्रियेशन’ तर्फे रंगणार भव्य एकांकिका

‘सृजन द क्रियेशन’ च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ह्या कार्यक्रमात सतीश जोशी देखील सहभागी झाले होते. हा कार्यक्रम सुरु असतानाच स्टेजवर कोसळून त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. सतीश जोशी यांनी अनेक मालिका, नाटक तसेच चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. दमदार भूमिकेतून मराठी सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात अनोखं स्थान निर्माण केलं. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीसाठी एक अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या निधनाने प्रेक्षकांना धक्का बसलाय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img