21 C
New York

Salman Khan: ‘बिग बॉस ओटीटी ३’ चं होस्टिंग सलमान करणार नाही? कोण आहे नवा होस्ट?

Published:

‘बिग बॉस ओटीटी’ पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी बिग बॉस २ चा ग्रँड फिनाले पार पडला. यंदा ‘बिग बॉस ओटीटी ३’ सुरु होणार असल्याची चर्चा रंगली आहे. परंतु, बिग बॉस म्हंटल की डोळ्यासमोर येतो बॉलीवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan). टीव्हीवरील ‘बिग बॉसचे सर्व सीझन आणि ओटीटीवरील दोन्ही सीझनचे होस्टिंग सलमान खानने केले आहे. मात्र येणाऱ्या सिझनमध्ये सलमान होस्ट करणार नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. सलमानच्या ऐवजी निर्मात्यांनी बॉलीवूडमधील तीन दिग्गज कलाकारांना विचारलं आहे.

अनुज थापरचा शवविच्छेदन अहवाल समोर!

सध्या सलमान त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. त्याच्या प्रोजेक्टचा तारखा आणि बिग बॉस ओटीटीच्या तारखा जुळत नसल्याने सलमान होस्ट करणार नाही अशी माहिती मिळत आहे. निर्मात्यांनी सलमान ऐवजी संजय दत्त, अनिल कपुर आणि करण जोहरला विचारण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस ओटीटी ३’ येणार नसल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता सर्व अफवा असल्याचं वृत्त आहे. मिळलेल्या माहितीनुसार, सलमानच्या शूटिंग डेट्स आणि बिग बॉस ओटीटीच्या शूटिंग डेट्स कॅल्श होत आहेत. जर सलमानला शो होस्ट जमले नाही, तर संजय दत्त, अनिल कपुर आणि करण जोहर यांचा विचार केला जाणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img