19.7 C
New York

Pankaja Munde : वडिलांच्या आठवणीत पंकजा मुंडे झाल्या भावुक

Published:

बीड

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. राज्यात 11 लोकसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये बीड लोकसभा (Beed Lok Sabha) मतदार संघाचा समावेश आहे मतदाना नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या आठवणीने भावनिक भावनिक झाल्या होत्या.

बीड लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतरनुसार माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की आज बाबा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असते तर माझ्यासाठी लढले असते असे म्हणत भावक पाहायला मिळाले.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, आज बाबा असते तर माझ्यासाठी लढले असते. माझ्या पत्रिकेतच संघर्ष लिहिलाय. त्यामुळे राजकारणात सहज मिळालं तर नेता होता येत नाही. त्यामुळे कठीण प्रसंगातून जावं लागतं. मुंडे साहेब शरीराने नसले तरी साहेबांची उर्जा माझ्यात आहे. त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत, अशा पंकजा मुंडे म्हणाल्या.

बीड लोकसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत 33.35% मतदान झाल्याची सरासरी नोंद निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आलेल्या माहिती मिळाली आहे. पंकजा मुंडे यांच्या विरोधात शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे रिंगणात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img