8.5 C
New York

Nanded : गुजरात एटीएसची नांदेडमध्ये मोठी कारवाई

Published:

नांदेड

लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) नांदेड सर्वाधिक चर्चेचे शहर होते. निवडणुकीनंतर देखील एका घटनेने नांदेड (Nanded) पुन्हा चर्चेत आले आहे. आज राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. अशाच नांदेड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरात एटीएसने (Gujarat ATS) नांदेड मधून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. या तरुणाचे पाकिस्तान (Pakistan) कनेक्शन असल्याचे उघडकीस झाल्याने तरुणाला सुरत पोलिसांनी (Surat Police) अटक केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यापूर्वी देखील पाकिस्तान से कनेक्शन असलेल्या व्यक्तीला मुंबईतून अटक करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात पोलिसांनी नांदेडमधील शेख शकील शेख सत्तार या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या तरुणाचं पाकिस्तान कनेक्शन असल्याचं उघड झालं आहे. सुरत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हा तरुण पाकिस्तामधील व्हॉट्सअॅप ग्रूपमध्ये अॅड असून तिथे सनातनच्या नेत्यांना जीवे मारण्याचं प्ल‌ॅनिंग करतानाचं चॅट सापडलं आहे. या प्रकरणाबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी सुरत येथील डीसीबी पोलीस ठाण्यात कलम 153-A,467,468,471,120- भा. दं. वि सहकलम 66-D, 67, 67-A आय. टी अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हा तरुण नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी येथील रहिवासी आहे. जैश बाबा राजपूत या व्हॉट्सअॅप ग्रूपवर सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्षांसह काही पत्रकारांनी जीवे मारण्यासंदर्भात चॅटिंग केल्याचा संशय आहे. पाकिस्तान येथील वकास आणि सरफराज हे दोघे जैश बाबा राजपूत नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप चालवतात. या ग्रुपमध्ये गुजरातच्या सुरतमधील सोहेल टिमोल आणि बिहारमधील शहनाज हे दोघे सामील आहेत. शिवाय नांदेड जिल्ह्यातील शेख शकील शेख सत्तार आणि अन्य एक जण या ग्रुपमध्ये असल्याची माहिती सुरत येथील पोलिसांना मिळाली. आरोपींनी या ग्रुपमध्ये सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा, हैदराबादचे आमदार राजासिंह, सुदर्शन वृत्त वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाण, नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी संदर्भात चॅटिंग केली. तसंच परदेशातून शस्त्र विकत आणण्यासाठी या ग्रुपमध्ये च‌ॅटिंग झाल्याचंही आढळून आलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img