22.3 C
New York

Metro : वादळी वाऱ्याचा मेट्रोला फटका वाहतूक ठप्प

Published:

मुंबई

पुण्यानंतर आता मुंबईला (Mumbai) देखील अवकाळी पावसाने अक्षरषः झोडपले आहे. या पावसासोबत प्रचंड मोठे वादळ (Stormy rain) देखील सुटले होते. मुंबईत पश्चिम उपनगरात काही ठिकाणी धुळीचे वादळ सुटले होते. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये बॅनर कोसळल्याने वर्सोवा-घाटकोपर मेट्रो (Metro) ठप्प झाली आहे.

सुरू झालेल्या वादळी वाऱ्यांनंतर अचानक अवकाळी पावसाला सुरूवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसाने मुंबईकरांची दैना झाली आहे. याचा फटका मेन लाईनलाही बसला. मेन लाईनवरील लोकल सेवा अर्धा तास उशिराने धावत होत्या त्यामुळे आधीच उशीरा ऑफिसला पोहोचलेल्यांची घरी जाताना वादळ-वारा आणि पावसाने अडवणूक केली आहे. मुंबई उपनगरात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू झाल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गावर झाडे उन्मळून पडली आहेत.

मुंबईला धुळीच्या वादळाचा तडाखा!

त्यामुळे एकीकडे मुंबई आणि परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मेट्रो देखील ठप्प झाली आहे. यामध्ये वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान बॅनर कोसळल्याने मेट्रो सेवा ठप्प झाली आहे त्यामुळे ऐन संध्याकाळी आणि गर्दीच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे या अवकाळी पावसाने मुंबईला अक्षरषः झोडपले आहे. तसेच ही पावसामुळे ही सेवा सुरळीत करता येत नाही. कारण त्यासाठी संपूर्ण वीज बंद करून पाऊस थांबणे गरजेचं आहे. गेल्या एक तासापासून मुंबईत अचानक वातावरण बदललं अन् वादळी पावसाने शहरात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने पाण्याचे तळे साचले असून वादळामुळे हवेत धुळीचे लोटच्या लोट उठल्याचे व्हिडीओ समोर येत आहेत. नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये बॅनर कोसळल्याने वर्सोवा-घाटकोपर मेट्रो ठप्प झाली आहे.

घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर बॅनर कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार ते पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे. काही गाड्यांमधून जखमींना बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना उपचारासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. काहींना गाडीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 7 जखमींना बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत बॅनरखाली 80 वाहने अडकली असल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img