काँग्रेसने महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाल्यास मराठी भाषेला (Marathi Language) अभिजाततेचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी झाले. याच दरम्यान काँग्रेसने ही घोषणा केल्याने याला विशेष महत्व आहे.
Marathi language : दहा वर्षे प्रलंबित
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय गेल्या दहा वर्षांपासून केंद्र सरकारच्या पातळीवर प्रलंबित आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत नकारात्मक भूमिका घेतली होती. या पार्शवभूमीवर जयराम रमेश म्हणाले, दहा वर्षापासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. मात्र, त्याकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करताना रमेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटले आहे कि, देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येईल. युपीए सरकारच्या काळात तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया या भाषांना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अभिजात भारतीय भाषेचा दर्जा दिला.
हेही वाचा : शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट दादा गटाच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य
Marathi language : कॉँग्रेसचा पाठपुरावा
२०१४ ला केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. पण, त्यावरत गेल्या दहा वर्षांत काहीही झाले नाही. इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लगेचच दिला जाईल, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.