21 C
New York

Loksabha : मतदानाची आकडेवारी उशिरा जाहीर, याचिका दाखल

Published:

नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशात 96 लोकसभा (Loksabha) मतदारसंघावर आज मतदान होत आहे. पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीचे टक्केवारी उशिरा जाहीर केल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. 17 मे रोजी या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

लोकसभेच्या पहिल्या दोन टप्यातील मतदानाची आकडेवारी उशिरा जाहीर केल्याने निवडणूक आयोगाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सकडून याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांचे वकिल प्रशांत भुषण यांनी तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी केली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुरुवातीच्या मतदानाच्या टक्केवारीच्या आकडेवारीत मोठी वाढ झाल्याच्या याचिकेत उल्लेख आहे. या प्रकरणी 17 मे रोजी सुनावणी घेऊ, अशी माहिती न्यायमुर्ती संजीव खन्ना यांनी याचिकाकर्त्यांना दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img