ठाणे, डोंबिवली आणि पालघर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी (Maharashtra Rain) पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील 3 ते 4 तास वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी प्रति तास असून काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोबतच नगर जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डोंबिवलीमध्ये गेल्या काही वेळापासून अचानक वादळाला सुरुवात झाली आणि काही ठिकाणी वादळासह पाऊसही सुरू झाला. त्याचवेळी बदलापूरमध्येही जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. या ठिकाणच्या पावसाचा वेग हा 107 किमी इतका असल्याचं सांगितलं जातं.
Unseasonal Rain : पुणे, रायगड, रत्नागिरीसह अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज
पुणे आणि रायगड जिल्ह्यात देखील पुढील 3-4 तास अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि धुळ्यात पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) , हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Unseasonal Rain बदलापूर मध्ये पावसाला सुरुवात तर कल्याण डोंबिवलीत धुळीसह जोरदार वारा
उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) , हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.