19.7 C
New York

Gurucharan Singh: गुरुचरण सिंगच्या तपासासाठी दिल्ली पोलीस पोहोचले मुंबईला!

Published:

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. दिल्ली पोलिसांकडून तपास सुरु आहे मात्र अद्याप पोलिसांच्या हाती कुठलीही माहिती मिळाली नाही. या प्रकरणी पोलीस २६ एप्रिलपासून त्याचा तपास घेत आहेत, पण अजूनपर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आता दिल्ली पोलीस मुंबईला पोहोचले आहेत. मुंबईतील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या सेटवर दिल्ली पोलिसांनी भेट दिली. अभिनेत्याच्या संपर्कात असलेल्या सहकलाकारांची चौकशी करण्यात आली आहे.


गुरुचरणच्या संपर्कात असलेल्या लोकांची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलीस मुंबईत पोहोचले. मध्यंतरी प्रोडक्शन हाऊसकडून गुरुचरण सिंगच्या मानधनाच्या बातम्या पसरल्या जात होत्या. त्या सर्व अफवा असल्याचं प्रोडक्शन हाऊसने सांगितलं. तसेच गुरुचरणचे सर्व पैसे आधीच देण्यात आले होते असं देखील सांगण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण सिंगच्या संपर्कात असलेल्या कलाकारांची त्यांनी चौकशी केली. सर्वांनी पोलिसांना चांगले सहकार्य केले आहे.

गुरुचरण सिंगच्या वडिलांची प्रतिक्रिया; केला मोठा खुलासा…


‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे प्रॉडक्शन हेड सोहेल रमाणी यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. “तपासाचा एक भाग म्हणून दिल्ली पोलिसांनी आमच्या सेटला भेट दिली होती. आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य केले. गुरुचरण सिंगची आमच्याकडे कोणतीही थकबाकी नाही. आम्ही प्रार्थना करतोय की गुरुचरण सिंग सुखरुप असेल, तसेच तो लवकर सापडेल, अशी आम्हाला आशा आहे,” असं सोहेल रमाणी म्हणाले. त्यांची प्रतिक्रिया ऐकून दिल्ली पोलीस पुन्हा परत गेले.


२२ एप्रिलला गुरुचरण सिंग दिल्लीहून मुंबईला येणार होता. त्यासाठी तो घरातून निघाला पण तो विमानतळावर गेला नाही आणि माघारी घरीही परतला नाही. त्याच्या वडिलांनी २६ एप्रिल रोजी पोलिसांना तक्रार दिली. तपासात तो ई-रिक्षाने काही ठिकाणी जाताना दिसला. त्याचा फोनही दिल्लीतील पालम भागात सोडून दिला होता. त्याच्या बँक खात्याची तपासणी केली असता तो १० हून जास्त खाती वापरत होता अशी माहिती समोर आली. त्याशिवाय तो दोन फोन आणि २७ ईमेल आयडीवापरत होता. त्याने त्याच्या अकाउंटमधून १४ हजार रुपये काढले होते, त्यानंतर अकाउंटमधून कोणतेही व्यवहार झालेले नाही. अभिनेत्याचं अपहरण झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img