21 C
New York

Vote: केवळ एका मतासाठी; पठ्ठ्याने दुबईवरून थेट संभाजीनगर गाठलं

Published:

छत्रपती संभाजीनगर /उमेश पठाडे

लोकशाहीमध्ये एका मताची (Vote) किंमत काय? असा प्रश्न नेहमी पडतो. तर एक व्यक्ती मतदान करण्यासाठी थेट दुबईवरून छत्रपती संभाजीनगरला आला आहे. आज चौथ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक पार पडत आहे. तर मतदान करण्यासाठी मतदाराने दुबईहून थेट छत्रपती संभाजीनगर गाठलं आहे.

राकेश पाटील, असं या जागरूक मतदाराचं नाव आहे. मतदान करण्यासाठी राकेश पाटील दुबईहून छत्रपती संभाजीनगरला आले आहेत. त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एन ३ या मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

राकेश पाटील हे मूळचे छत्रपती संभाजीनगरचे आहेत. पाटील मागील वीस वर्षांपासून दुबईत व्यावसायिक म्हणून राहतात. आपल्या एका मताचं महत्त्व लक्षात घेऊन राकेश पाटील यांनी दुबईवरून छत्रपती संभाजीनगर गाठलं. त्यानंतर आज मतदान केलं आहे. राकेश पाटील सध्या शहरात कौतुकाचा विषय ठरले आहेत. केवळ एका मतासाठी त्यांनी हजारो किमीचा प्रवास केला आहे. त्यांनी सर्वांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे.

राज्यात आज अकरा मतदारसंघांमध्ये मतदान आज पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये आज 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 96 लोकसभा जागांवर मतदान होत आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, झारखंड, आणि जम्मू-काश्मीर येथे मतदान होत आहे. अनेक ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणात मतदान होत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img