19.7 C
New York

Election 2024: कोणत्या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क!

Published:

देशभरात आज (१३ मे) चौथ्या टप्यातील मतदान आहे. सकाळपासून मतदानाला (Election 2024) सुरवात झाली आहे. अनेक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच कलाकारांनी देखील मतदान केले आहे. राज्यात आज ११ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात शिरूर, मावळ, पुणे मतदारसंघांचा समावेश आहे. यासाठी शिरूर मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी देशातील प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असा संदेश दिला आहे.

राज्यासह देशात अनेक ठिकाणी मतदान सुरु आहे. तेलंगणातीळ बऱ्याच ठिकाणी मतदान होणार आहे. त्यात अल्लू अर्जुन, जुनिअर एनटीआर (Junior NTR) यांनी मतदान केले. दराबादमधून अल्लू-अर्जुन (Allu Arjun) मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचला आहे. ‘पुष्पा’ फेम अभिनेत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. माध्यमांशी बोलताना अल्लू अर्जुनने ‘कृपया मतदान करा, भारतीय नागरिक म्हणून हि आपली जबाबदारी आहे. पुढील पाच वर्षांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे’ असा संदेश दिला.

राज्यात आज चौथ्या टप्प्यासाठी 11 मतदारसंघात मतदान सुरु


चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. पुण्यात सुद्धा मतदान होत असल्याने पुणेकरांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. कोथरूडमध्ये राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांनी मतदान केले. तर पुण्यात सुबोध भावेंनी मतदान केले. मराठी अभिनेता सुबोध भावेने (Subodh Bhave) पुण्यात मतदानाच हक्क बजावला. मतदान केल्यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.


सुबोध म्हणाला, “मला लोकशाहीने जो हक्क दिलाय, त्यानुसार माझ्या एका मताची किंमत खूप मोठी आहे याची जाणीव मला आहे. म्हणून मी मतदानासाठी मुंबईतून प्रवास करून पुण्यात येतो, मग पुन्हा मुंबईत जाऊन काम करतो. मी आणि माझी पत्नी मतदान करतो, लवकरच माझा मुलगा १८ वर्षांचा होईल, तोही मतदान करेल. मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे, निवडणुकांचा उत्सव आहे, आपण दिलेल्या मतांच्या आधारे आमदार, खासदार निवडून येतात. आपण मत न दिल्याने काय फरक पडणार आहे, असा निराशावादी विचार करून तुम्ही घरात बसून राहिलात तर त्याने कोणताही बदल घडणार नाही. तुम्ही कुठल्याही उमेदवाराला मत द्या, जो तुम्हाला योग्य वाटतो, त्याला मत द्या, पण मत द्या. मत वाया घालवू नका.”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img