पुण्यानंतर आता मुंबईला (Mumbai) देखील अवकाळी पावसाने अक्षरषः झोडपले आहे. या पावसासोबत प्रचंड मोठे वादळ (Stormy rain) देखील सुटले होते. मुंबईत पश्चिम उपनगरात काही ठिकाणी धुळीचे वादळ सुटले होते. हा पाऊस सोबत वादळी वारा घेऊन आलाय. त्यामुळे अनेक ठिकाणी काही अनपेक्षित घटना घडल्या आहेत. मुंबईत दोन ठिकाणी भलेमोठे होर्डिंग कोसळल्याच्या घटना घडल्या. घाटकोपरमध्ये तर थेट पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं आहे. या होर्डिंग कोसळल्याचे दृश्य अंगावर काटा आणणारे आहेत. होर्डिंग कोसळल्याच्या दोन घटना ताज्या असतानाच मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल कोलमडली आहे. वादळी वाऱ्यामुळे मध्य रेल्वे मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली असून पश्चिम रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे. मध्य रेल्वेवर ठिकठिकाणी स्पार्क झाल्याने लोकल अनेक ठिकाणी थांबून थांबून पुढे जात आहेत. तर मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यान ओव्हर हेड वायारचा खांब कोसळल्याने धीम्या मार्गावरील वाहतूक बंद आहे
मुसळधार पावसाचा उद्धव ठाकरेंना फटका, सभा रद्द
Stormy rain ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय
आठवड्याचा आज पहिला दिवस आहे. त्यामुळे लाखो नागरीक आज आपापल्या ऑफिस आणि कार्यालयांमध्ये नित्य नियमाने गेले. नियोजित वेळापत्रकानुसार लाखो प्रवासी संध्याकाळच्या वेळेस आपल्या कार्यालयीन कामकाम पूर्ण करुन घराच्या दिशेला निघतात. पण ऐन गर्दीच्या वेळेस अचानक पाऊस आला. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानक दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळला. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. परिणामी लोकल ट्रेनच्या लांबच्या लांब रांगा रेल्वे रुळावर बघायला मिळाल्या. बराच वेळ झाला तरी लोकल ट्रेन सुरु न झाल्यामुळे नागरीक लोकल ट्रेनच्या खाली उतरले आणि त्यांनी रेल्वे रुळावरुन पायी जाणं पसंत केलं.
Stormy rain मुंबई मेट्रो ठप्प
मुंबईत पश्चिम उपनगरात काही ठिकाणी धुळीचे वादळ सुटले होते. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये बॅनर कोसळल्याने वर्सोवा-घाटकोपर मेट्रो (Metro) ठप्प झाली आहे.
Stormy rain विमानसेवेवरही परिणाम
या वादळी वाऱ्याचा परिणाम विमानसेवेरही झाला असून काही विमानांचे उड्डाण वळवण्यात आले आहे
Stormy rain प्रशासनाकडून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न
ठाणे आणि मुलुंड दरम्यान झालेल्या बिघाड्याची गंभीर दखल मध्य रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. गर्दीची वेळ असल्याने तातडीने प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु आहेत. तर दुसरीकडे तांत्रिक बिघाड कधी दुरुस्त होतो आणि ट्रेन कधी चालू होतात, याची प्रवाशी ताटकळत वाट पाहत आहेत.