23.1 C
New York

Ghatkopar: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला ; मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश

Published:

मुंबईत सोमवारी वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान (Rain Desaster) घातले. पावसापेक्षा वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता कि यात अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. तर घाटकोपर (Ghatkopar) येथे मोठे होर्डिंग (Hording) कोसळले. या होर्डिंगखाली अडकून आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर 100 वर नागरिक आणि तब्ब्ल 80 हुन अधिक वाहने अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या 67 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. हे होर्डिंग पेट्रोल पम्पावरच कोसळल्याने मोठ्या संख्येने वाहने यात अडकली.
पेट्रोल पंपावर कोसळलेले होर्डिंग हे बेकायदेशीर असल्याची माहिती आहे. होर्डिंग कोसळल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या बचाव कार्यासाठी दाखल झाल्या. त्यांनी जवळपास 35 जखमींना बाहेर काढले असून जखमींना उपचारासाठी शहरातील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : अमित शहा-एकनाथ शिंदेंना ढगाळ हवामानाचा फटका

Rain Desaster : अनेक वाहने अडकली


पेट्रोल पंपावरच होर्डिंग कोसळल्याने गोंधळ उडाला. इंधन भरण्यासाठी पंपावर आधीच गर्दी होती. त्यातच पाऊस व वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी अनेक वाहने आणि नागरिक थांबले होते. हे नागरिकदेखील होर्डिंगखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून वाहनांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

Rain Desaster : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले. शहरातील सर्व बेकायदा होर्डिंग तत्काळ हटवण्याचे आदेशही शिंदे यांनी दिले आहेत. घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याचे तसेच जखमींवर मोफत उपचार करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img