25.1 C
New York

Pimpri Chinchwad : मतदान केंद्रावर गोंधळ, ठाकरे गटाच्या शहराध्यक्षाला अटक

Published:

पिंपरी चिंचवडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल पिंपरी चिंचवडचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वाकड पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भोसले यांना अटक झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन भोसले हे नागु बारणे प्रशालेतील मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी मोबाईल मागवून घेत मतदानाचे मशीन उलट्या क्रमाने लावले असल्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. तसेच त्यांनी मतदान प्रक्रिया राबविण्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत उद्धट वर्तन केले. त्यांच्या कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

सचिन भोसले (Sachin Bhosale) यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केल्याची माहिती मिळाली आहे. (Pimpri Chinchwad News) पण मशीन उलटे लावल्याचा जाब विचारल्याने खोटा गुन्हा (Pimpri Chinchwad Crime News) दाखल केल्याचा भोसले यांनी दावा केला आहे.

पवारांबाबत दादा गटाच्या नेत्याचे मोठे वक्तव्य

Pimpri Chinchwad मावळ लोकसभेला काय स्थिती?

शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष असलेल्या मावळ लोकसभेमध्ये सुद्धा दुपारी एक वाजेपर्यंत पनवेल मतदारसंघांमध्ये 26.93 टक्के मतदानाची नोंद झाली. कर्जतमध्ये 29.47 टक्के मतदानाची नोंद झाली. उरणमध्ये 29.6 टक्के मतदानाची नोंद झाली. मावळमध्ये 28.3 टक्के मतदानाची नोंद झाली. चिंचवडमध्ये 26.12 टक्के मतदानाची नोंद झाली. पिंपरीमध्ये 23.96 टक्के मतदानाची नोंद झाली. तर मावळमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत पनवेल मतदारसंघांमध्ये 34.93, कर्जतमध्ये 38.3, उरणमध्ये 42.89, मावळमध्ये 37.5, चिंचवडमध्ये 35.8 तर पिंपरीमध्ये 33.74 मतदानाची नोंद झाली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img