23.1 C
New York

CBSC Result: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

Published:

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा (CBSC Result) निकाल जाहीर झाला आहे. ८७ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. यावेळीही मुलींनीच बाजी मारली आहे. जवळपास २४ हजार विद्यार्थी ९५ टक्केहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. तर १.१६ लाख विद्यार्थ्यांनी ९० टक्केहून अधिक गुण मिळवले आहेत.
सीबीएसईने १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल या कालावधीत बारावीची परीक्षा घेतली. या परीक्षेला १६ लाख २१ हजार २२४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ लाख २६ हजार ४२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थी आपला निकाल cbse.nic.in, cbse.gov.in, cbseresults.nic.in, results.cbse.nic.in या संकेतस्थळांवर पाहू शकतात. गेल्या वर्षी ९०.६८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. यावर्षी त्यात वाढ झाली असून ९१.५२ टक्के यंदा उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण मुलांचे प्रमाणही यावर्षी वाढले आहे. गेल्या वर्षी ८४.६७ टक्के या वर्षी मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण होते ते आता ८५.१२ टक्के आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img