7.8 C
New York

AIMIM-Vanchit conflict : संभाजीनगरमध्ये एमआयएमचा नवा डाव

Published:

AIMIM-Vanchit conflict : वंचितची पोलिसांत तक्रार

उमेश पठाडे / छत्रपती संभाजीनगर
वंचित बहुजन आघाडी पक्षाने साथ सोडल्याने सैरभैर झालेल्या एमआयएमने (AIMIM-Vanchit conflict) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मतदारसंघात अपप्रचार सुरु केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. एमआयएमचे उमेदवार विद्यमान खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी वंचित आघाडीचा आपल्याला पाठिंबा असल्याचे पत्रक मतदारसंघात वाटले आहे. आमचा एमआयएमला कोणताही पाठिंबा नाही, जलील यांनी हा खोडसाळपणा केला आहे, असा आरोप करत वंचितचे उमेदवार अफसर खान यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हेही वाचा : राज्यात आज चौथ्या टप्प्यासाठी 11 मतदारसंघात मतदान सुरु

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. त्यामुळे इम्तियाज जलील यांना विजय सोपा झाला होता. पण, एमआयएमशी केलेल्या आघाडीचा वंचितला महाराष्ट्रात इतरत्र कुठेही फायदा झाला नव्हता. त्यामुळे वंचितने यावेळी एमआयएमशी आघाडी केली नाही. याचा मोठा फटका एमआयएमला बसताना दिसत आहे. त्यामुळे सैरभैर झालेल्या एमआयएमने खोडसाळपणा सुरु केला आहे.
एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात एक पत्रक सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा आपल्याला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी केला आहे. जलील यांना पराभव दिसत असल्याने ते असा खोडसाळपणा करत असल्याचे खान यांनी म्हटले आहे. अफसर खान यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात जलील यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा दिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img