3.6 C
New York

Abdu Rozik: अब्दुचा साखरपुडा पब्लिसिटी स्टंट? अब्दुने केला खुलासा!

Published:

प्रसिद्ध गायक, ‘दुबईचा छोटा भाईजान’ आणि ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वातून घराघरात पोहोचलेला अब्दु रोजिक (Abdu Rozik) नेहमीच चर्चेत असतो. मात्र अब्दुने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने लवकरच बोहल्यावर चढणार असल्याची माहिती दिली. छोट्या भाईजानने आयुष्यभराची जोडीदार शोधली आहे. सध्या तो चांगलाच चर्चेत आला आहे. मात्र आता त्याने साखरपुडाचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

अंगठी घालतानाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. अद्याप त्याने होणाऱ्या बायकोचा चेहरा दाखवला नाही. 7 जुलै 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती अब्दुने दिली. त्यानंतर 10 मे 2024 त्याने साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. फोटोमध्ये अब्दु आपल्या होणाऱ्या पत्नीला साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत आहे.

मात्र नेटकऱ्यांनी अब्दु रोझिकने अमीरासोबत केलेला साखरपुडा हा एक पीआर स्टंट असल्याचे म्हटले. परंतु हे सर्व दावे, आरोप अब्दुने फेटाळून लावले. ईटाइम्ससोबत बोलताना त्याने सांगितले की, मी माझ्या कोणत्याही म्युझिक व्हिडीयोचा पीआर नाही करत. माझ्यासारख्या लहान उंचीच्या व्यक्तीला प्रेम मिळालं आहे, हे काहींना बघवत नाही असेही अब्दुने म्हटले. पुढे अब्दू म्हणाला, एका फूड जॉईंटवर अमीरासोबत भेट झाली त्याच क्षणी एकाच नजरेत प्रेम झाले. त्याने सांगितले, आपली प्रेयसी खूपच समजूतदार आहे. अमीरा खूपच सुंदर आहे. तिचे लांब केस आणि सुंदर डोळे आहेत. आम्ही दोघांना एकमेकांना चार महिन्यांपासून ओळखतो. ती एक बिझनेस एडमिनिस्ट्रेशनच्या विषयाची विद्यार्थीनी आहे. ती समजूतदार असून आमच्यात चांगली बाँडिंग आहे असेही अब्दुने म्हटले. त्यामुळे हा कुठलाही पीआर स्टंट नसून ईश्वराच्या कृपेने मला समजुदार जोडीदार भेटली आहे. अब्दुने म्हटले की, तिची उंची 155 सेमी आणि माझी उंची 115 सेमी आहे. या जगात अनेक असे लोक आहेत, दिव्यांग आहेत आणि त्यांना आपल्या जीवनाचा जोडीदार मिळतो. मी लहान असताना मला जीवनसाथी भेटणार की नाही, याची चिंता सतावत असे.

२० वर्षांचा अब्दु रोजिकचा पार पडला साखरपुडा!

फोटो शेअर करत अब्दुने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,”Allhamdulillah 24.04.2024″. याचा अर्थ की अब्दुने अमीरासोबत 24 एप्रिल 2024 रोजी साखरपुडा केला आहे”. तो दुबईमधील अमीरा नावाच्या मुलीसोबत लग्न करणार आहे. त्याची होणारी बायको १९ वर्षाची आहे. शुक्रवारी व्हिडीओ शेअर करत अब्दुने लिहिलं आहे, “मी माझ्या आयुष्यात कधी विचार केला नव्हता की, मी एवढा नशीबवान असेन. कारण माझ्यावर खूप प्रेम करणारी व आदर करणारी आयुष्यभराची जोडीदार मला भेटली आहे. ७ जुलै तारीख लक्षात ठेवा. मी खूप आनंदी आहे की हा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही.”

शिव ठाकरेला याबाबत एका मुलाखतीत प्रश्न विचारला. त्यावर शिव म्हणाला, “मी आताच अर्ध्या तासापूर्वी अब्दूसोबत बोललो परंतु त्याने मला काही सांगितले नाही. त्याच्या रिलेशनच्या बातम्या मला सोशल मेडियावरून कळत होत्या. त्यामुळे हि माहिती खरी आहे की खोटी, यासंदर्भात मला कल्पना नाही.” अब्दुच्या या फोटोजवर कंमेंट्सचा पाऊस पडत आहे. अब्दुच्या पोस्टवर चाहत्यांसोबत सेलिब्रिटीच्या कंमेंट्सचा वर्षाव होत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img