22.3 C
New York

Loksabha Elections : राज्यात 11 वाजेपर्यंत 17.51% मतदान

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) चौथ्या टप्प्यात आज देशात मतदान पार पडत आहे. देशात 96 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. तर महाराष्ट्रात 11 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 17.51% सरासरी मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

सकाळी 11 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर) लोकसभा मतदारसंघात 21.35 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. तर सर्वाधिक कमी मतदान 14.51 टक्के शिरूर लोकसभा मतदारसंघात नोंदवण्यात आले आहे.

मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

नंदुरबार – २२.१२ टक्के
जळगाव- १६.८९ टक्के
रावेर – १९.०३ टक्के
जालना – २१.३५ टक्के
औरंगाबाद – १९.५३ टक्के
मावळ -१४.८७ टक्के
पुणे – १६.१६ टक्के
शिरूर- १४.५१ टक्के
अहमदनगर- १४.७४ टक्के
शिर्डी -१८.९१ टक्के
बीड – १६.६२ टक्के

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img