21 C
New York

Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी सांगता सभेत का वापरला उदयनराजेंचा एक्का

Published:

लोकसभा निवडणुकीचा (LokSabha Election) राज्यातील चौथ्या टप्प्याचा प्रचार आज थांबला. चौथ्या टप्प्यात राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून, सोमवारी या जागांसाठी मतदान होणार आहे. त्यात बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघाचा समावेश आहे. येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) विरुद्ध शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात लढत होत आहे. मुंडे या ओबीसी आहेत. तर सोनवणे हे मराठा समाजातील आहेत. मराठाविरुद्ध ओबीसी असा उघड संघर्ष या मतदारसंघात दिसून येत आहे. पंकजा मुंडे यांनी अनेकदा जातीचे राजकारण होत असल्याचा उल्लेख केला आहे. तसाच आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी थेट उदयनराजे भोसले यांची सभा मतदारसंघात ठेवण्यात आली होती.

मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात सर्वाधिक उग्र आंदोलने झाली. त्यात नेत्यांची घरे जाळल्याच्या प्रकार घडले आहे. त्याचे पडसाद आता थेट निवडणुकीच्या प्रचारात दिसून येत आहे. या मतदारसंघात मनोज जरांगे यांचा मोठा प्रभाव आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी तर थेट मराठा आरक्षणाचा नावावर, जरांगे यांच्या नावावर मते मागितले आहे. त्यामुळे येथून पंकजा मुंडे यांना फटका बसू शकतो, असे बोलले जात आहे. हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उदयनराजे भोसले यांची सभा बीडमध्ये घेण्यात आली. उदयनराजे हे सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे ते इतर मतदारसंघात जाऊ शकले नाहीत. परंतु तेथील मतदान संपल्यानंतर उदयनराजे हे इतर मतदारसंघात प्रचाराला गेले नाहीत. मराठवाड्यात अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत. तेथे गेले नाहीत. परंतु पंकजा मुंडेसाठी बीडमध्ये आले. पंकजा मुंडेंना उदयनराजे बहिणच मानतात. त्यात उदयनराजे यांनी केलेले भाषणही भावनिक होते.

मी राजीनामा देईल जर तुम्ही पंकजा मुंडेंना मतदान केले नाहीतर आणि तिला सातारा निवडून देईल, असं वक्तव्य करत उदयनराजे भोसले यांनी केले. त्यावेळे ते भावूक झाले होते. अनेक मराठा आमदार, माजी आमदार पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभं आहेत. मराठा समाजातून तरीही त्यांना किती मते मिळतील हा महत्त्वाचा मुद्दे आहे. त्यामुळे शेवटच्या प्रचार सभेत पंकजा मुंडे यांनी उदयनराजे भोसले यांना बोलवून एक प्रकारे मराठा जातीचे हत्यार उपसले आहे. त्यानंतर मराठा मतदान हे पंकजा मुंडे कडे वळेल हा ही प्रश्न आहे.

… आणि देशात आघाडी सरकारांचं युग सुरू झालं

Pankaja Munde पंकजा मुंडेंची मुस्लिम समाजाला साद

या निवडणुकीत मराठा मतदान पाठीशी न राहिल्यास निवडणूक पंकजा मुंडेंना जड जाऊ शकते. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी इतर जातींना आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत पंकजा मुंडे यांनी थेट मुस्लिम समाजाला साद घातली आहे. दहा वर्षांत तुमच्या केसाला धक्का लागला आहे का, असा प्रश्न मुंडे यांनी विचारत मुस्लिम समाजाने पाठीशी राहण्याचे आवाहनच केले आहे.

Pankaja munde काय आहे जातीचे गणित ?

या मतदारसंघात ओबीसी मतदार जास्त आहेत. त्यात वंजारी समाज सुमारे पाच लाख आहे. माळी, धनगर व इतर ओबीसी जाते असे सुमारे दोन लाख मतदार आहेत. ओबीसींचे सात लाख मतदार आहेत. तर मराठा मतदारही सुमारे सात लाख आहेत. त्यामुळे या मतदारसंघात दलित आणि मुस्लिम समाजा निर्णायक राहू शकते. या मतदारसंघात मुस्लिम समाज सुमारे अडीच लाख आहे. तर दलित समाज दोन ते सव्वा दोन लाख आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img