23.1 C
New York

Sharad Pawar : शरद पवारांचं जरांगेंसंदर्भात मोठं विधान!

Published:

बीड

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) चौथ्या टप्प्यातील मतदान उद्याला पार पडणार आहे. या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावले आहे. यापूर्वी बीड लोकसभा (Beed Lok Sabha) मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.

शरद पवार म्हणाले, जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊन पुढे चालले आहेत त्यांनी गरीब मराठ्यांसाठी काम केलं अशा शब्दांत शरद पवार यांनी जरांगे पाटील यांचे कौतुक केले. मनोज जरांगे पाटील यांची मी भेट घेतली होती. त्यांचे धोरण समजून घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हा मी त्यांना विनंती केली की राज्यातील सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन सामाजिक ऐक्य मजबूत करू. शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा विचार घेऊन जरांगे पाटील चालले आहेत असेही पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, आज मला एका गोष्टीची आठवण होते. बीड जिल्ह्यात संकट असेल दुष्काळ असेल, पण मनाने अतिशय दिलदार लोकांचा हा जिल्हा आहे. एकदा या जिल्ह्यामध्ये मी विनंती केली आणि विनंतीला मान देऊन जिल्ह्याने सर्वच्या सर्व आमदार आमच्या पक्षाचे निवडून दिले. या जिल्ह्याने ऐतिहासिक काम करुन दाखवले. आमदार दिले पण सत्ता दुसऱ्यांना दिली. आमदार सगळे आपले पण सत्ता दुसरीकडे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेचं दुखणं कमी कसं करायचं? असा सवालही पवार यांनी केला.

शरद पवार म्हणाले, केंद्र सरकारमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी बीडमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला माजी हजेरी होती. व्यासपीठावर बसल्यानंतर जुन्या लोकांची आठवण झाली. या जिल्ह्याने क्रांतीसिंह नाना पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केलं. नाना पाटील सातारा जिल्ह्याचे होते. उभे राहिले बीड जिल्ह्यात. या जिल्ह्यातील जनतेने स्वातंत्र्यासाठी त्याग केला. मोठ्या नेत्याचा सन्मान केला. नाना पाटील यांनी या जिल्ह्यात घोषणा केली होती. मात्र, सरकार बदल्यामुळे ती त्यांना पाळता आली नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img