ठाणे
लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज्यातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार राज ठाकरे करत आहे. त्या स्पर्शभूमीवर महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या प्रचार प्रचार सभेतून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, ठाणे जिल्हा हा जगातील एकमेव जिल्हा असेल जिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचे लोंढे येत असतील. ठाणे जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे जिथे 7 ते 8 महापालिका आहेत. हे का झालं ? याला कारण बाहेरून येणाऱ्या लोकांचे लोंढे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत.
राज ठाकरे म्हणाले की, श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांना माझं सांगणं आहे की, तुम्ही या लोंढ्यांचा प्रश्न लोकसभेत मांडा. मेट्रो आणा किंवा अजून काही आणा, काही फरक पडणार नाही. सगळं जैसे थे राहणार. इथला मूळचा करदाता नागरिक सोयी-सुविधांपासून वंचित राहणार.
राज ठाकरे म्हणाले की, श्रीकांत शिंदेंनी सांगितलं तसं फेव्हिकॉलचा जोड, पण पुढच्या वेळेला आतून लावा पण, नाही तर आमची बाजू बाहेरच. असं म्हणत त्यांनी खोचक टोला दिला. आनंद मठात गेलो, तेव्हा जुने दिवस आठवायला लागले. आनंद दिघे आणि माझे मैत्रिपूर्ण संबंध होते. तेव्हा त्यांना मी सांगायचो आश्रम स्वच्छ ठेवा. सर्वत्र अस्वच्छता असायची आणि ते त्यातच झोपायचे, आज लक्षात नाही आलं की, त्याच वास्तूत आलोय. तेव्हा आचारसंहिता वगैरे काही नव्हतं. रात्री 12-1 पर्यंत भाषणं चालायची. ठाणे टुमदार शहर होतं. तलाव बुजवलेत आणि टँकर सुरु झालेत. 30-35 वर्षांआधीचं असेल ते ठाणे, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले की, आज इथे ठाण्यात आल्यावर आनंद मठामध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर सर्व जुने दिवस आठवायला लागले. माझे आणि आनंद दिघे यांचे एक वेगळ्याप्रकारचे मैत्रीचे संबंध होते. मी पूर्वी त्यांना सांगायचो जेव्हा तिथे जायचो तेव्हा सांगायचा अहो स्वच्छ ठेवाओ. कुठे कुंकू पडलंय, कुठे काय, त्याच्यातच झोपायचे. आज गेलो तर लक्षातच आलं नाही की मी याच वास्तूत आलोय. त्यांच्याबरोबर तेव्हा ठाणे फिरताना मजा यायची. तेव्हा ठाणं टुमदार होतं. मी लहानपणी बाळासाहेबांबरोबर किती वेळा आलो. तेव्हा रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत सभा चालायच्या. त्यावेळी व्यासपीठं एवढे मोठे नसायची असं राज ठाकरे म्हणाले.