23.1 C
New York

Prakash Ambedkar : मोदींची पवार, ठाकरे यांना ऑफरवर आंबेडकरांचे मोठे वक्तव्य

Published:

पालघर

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) नंदुरबारमधील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एनडीए (NDA) मध्ये येण्याची जाहीर ऑफर दिली होती. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पालघर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पार चा नारा दिला असून त्या पार्श्वभूमीवर प्रचारही सुरू आहे. मात्र देशातील वातावरण पाहता भाजप 272 चाही आकडा गाठणार नाही त्यामुळेच त्यांनी पवार आणि ठाकरेंना ऑफर दिली आहे, असा टोला लगावला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आमच्या सोबत या अशी दिलेली ऑफर म्हणजे ते 272 पर्यंत पोहचत नाहीत याची कबुली असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी आज पालघर मध्ये केला. पालघर लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार विजया म्हात्रे यांच्या प्रचार सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

एनडीए देशात 272 हा आकडा पार करू शकत नाही आणि ते त्यांच्या भाषणांमधून दिसून येत येत आहे . शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी येत्या काळात आमच्या सोबत यावं अन्यथा त्यांची काही खैर नाही, असाच इशारा एक प्रकारे मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दिला असल्याची टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेतून केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img